जीएसटीविरुद्ध कापड विक्रेत्यांची निदर्शने

By Admin | Updated: June 24, 2017 02:43 IST2017-06-24T02:43:21+5:302017-06-24T02:43:21+5:30

द होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंट असोसिएशनने शुक्रवार, २३ जूनला सकाळी ११ वाजता होलसेल क्लॉथ मार्केट,

Cloth Vendors' demonstrations against GST | जीएसटीविरुद्ध कापड विक्रेत्यांची निदर्शने

जीएसटीविरुद्ध कापड विक्रेत्यांची निदर्शने

होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंट असो. : फॅब्रिक्सवर ५ टक्के जीएसटी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : द होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंट असोसिएशनने शुक्रवार, २३ जूनला सकाळी ११ वाजता होलसेल क्लॉथ मार्केट, गांधीबाग येथे जीएसटीच्या विरोधात धरणे-आंदोलन केले आणि केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शन केली.
असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार मदान यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर कापड जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे करमुक्त आहे. पण जीएसटी कौन्सिलने ३ जूनच्या बैठकीत टेक्सटाईल आणि फॅब्रिक्सवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे देशातील कापड व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. कपड्यावरील जीएसटीमुळे देशातील छोटे व्यापारी आणि विणकरांचा रोजगार संकटात येणार आहे. टेक्सटाईल आणि फॅब्रिक्स जीएसटीमधून करमुक्त करण्याची असोसिएशनची सरकारकडे मागणी आहे.
‘सीएएमआयटी’चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी सांगितले की, केंद्र सरकारने टेक्सटाईल आणि फॅब्रिक्सला जीएसटीच्या टप्प्यातून बाहेर ठेवावे. व्यापाऱ्यांची मागणी ‘सीएएमआयटी’ लावून धरणार असून या संदर्भात केंद्रीय वित्तमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देणार आहे.
धरणे प्रदर्शनात असोसिएशनचे दिनेश सारडा, गोपाल भाटिया, महेश कुकडेजा, जयेश तन्ना, गोपाल मुलतानी, मानक भुतडा, अशोक अटलानी, अरविंद चांडक, कमल कपुरिया, कश्मीर खुंगर, प्रकाश डागा, सतीश मिरानी, उमाकांत जाजू, सुनील चचडा, विजय पुन्यानी, अशोक हुडिया, जेठमल डागा, प्रताप थावरानी, पीयूषकुमार शाह, कपील जाजू, चंद्रशेखर मदान, ललित सारडा, रवी जुनेजा, शांतीलाल झामड, सुरेश केवलरामानी, इंद्रजीत मदान, हेमंत चांडक, तुलसी चांडक, रूपचंद लोया, सुभाष पुन्यानी, ओमप्रकाश लालवानी उपस्थित होते.

Web Title: Cloth Vendors' demonstrations against GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.