नृत्य शिबिराचा समारोप सोमवारी
By Admin | Updated: June 5, 2016 02:50 IST2016-06-05T02:50:16+5:302016-06-05T02:50:16+5:30
लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबतर्फे १० दिवसीय नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नृत्य शिबिराचा समारोप सोमवारी
लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबचा नृत्याविष्कार :
१५० पेक्षा अधिक सदस्य आणि कोरिओग्राफर यांचे विशेष सादरीकरण
नागपूर : लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबतर्फे १० दिवसीय नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे समापन सोमवारी ६ जून रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता करण्यात येणार आहे. २० ते ३० मे दरम्यान घेण्यात आलेल्या या नृत्य शिबिरात जवळपास २०० कलावंतांनी सहभाग घेतला.
शिबिरात हिपहॉप, कमटेम्पररी, बॉलिवूड स्टाईल, पंजाबी स्टाईल आणि उपशास्त्रीय नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले. २४ आणि २५ मे रोजी सुप्रसिद्ध बॅले कोरिओग्राफर राहिल अन्सारी यांनी सहभागींना बॅले नृत्य शिकविले. देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात सर्व सहभागी विद्यार्थी आणि महिला नृत्य सादर करणार आहेत.
यात ‘मै दिवानी मस्तानी..., गजरे ने किया है इशरा..., ये मोह मोह के धागे..., पिंगा ग पोरी पिंगा...’ आदी गीतांवर नृत्य सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी नि:शुल्क आहे. सर्व सखी मंच सदस्य, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लब सदस्य कार्यक्रमात कुटुंबासह आमंत्रित आहेत.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी इव्हेन्ट कार्यालय, २४२३५२७, ९८५०३०४०३७ आणि ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)