लाल बसच्या ५२ फेऱ्या बंद करणार

By Admin | Updated: April 7, 2017 02:57 IST2017-04-07T02:57:02+5:302017-04-07T02:57:02+5:30

विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, यासाठी काही मार्गांवर शहर बसेस सोडल्या जातात. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात

Close the 52 buses of Red Bus | लाल बसच्या ५२ फेऱ्या बंद करणार

लाल बसच्या ५२ फेऱ्या बंद करणार

परिवहन विभागाचा निर्णय : शाळा-महाविद्यालयांच्या सुटीचा परिणाम
नागपूर : विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, यासाठी काही मार्गांवर शहर बसेस सोडल्या जातात. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने ९ एप्रिलपासून अशा मार्गावरील लाल बसच्या ५२ फेऱ्या बंद करण्यात येणार आहे.
शासकीय व निमशासकीय कार्यालये असलेल्या मार्गावर नोकरदारांच्या सुविधेसाठी बसेसच्या फेऱ्या लावण्यात आलेल्या आहेत. परंतु रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी अशा मार्गावर प्रवासी नसतात. याचा विचार करता सुटीच्या दिवशी या मार्गावरील बसेसच्या फे ऱ्या कमी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या मार्गावरील बसेच शहरातील अन्य मार्गावर सोडण्यात येतील.
मात्र महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा फटका कारखाने व खासगी संस्थात काम करणाऱ्या कामगारांना बसणार आहे. रविवार व शासकीय सुटीच्या औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने सुरू असतात. यात एमआयडीसी बुटीबोरी, हिंगणा व अन्य औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या बसेसचे १४२ मार्ग निश्चित केलेले असले तरी प्रत्यक्षात ६८ मार्गांवरच बसेस धावतात. सध्या शहरात तीन आॅपरेटरच्या २१० रेड बसेस व चौथ्या आॅपरेटच्या पाच ग्रीन बसेस शहरात धावत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Close the 52 buses of Red Bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.