हवामान बदलाचा होतोय ऋतूंच्या कालावधीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:35+5:302021-01-25T04:08:35+5:30

मेहा शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील हवामानाच्या वेळापत्रकात मागील काही वर्षांपासून चिंताजनक बदल घडत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ...

Climate change affects the duration of the seasons | हवामान बदलाचा होतोय ऋतूंच्या कालावधीवर परिणाम

हवामान बदलाचा होतोय ऋतूंच्या कालावधीवर परिणाम

Next

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील हवामानाच्या वेळापत्रकात मागील काही वर्षांपासून चिंताजनक बदल घडत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळेच ऋतुमानात हे बदल घडत आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी हे सर्वाधिक थंडीचे महिने मानले जात असले तरी या वर्षात दोन दिवसांचा अपवाद वगळता या संपूर्ण कालावधीत थंडीचा अनुभव आला नाही.

विदर्भ उष्णतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र २०१९ मध्ये विदर्भातील उन्हाळा म्हणावा तसा तापला नाही. मुख्यतः मागील वर्षात बहुतेक काळ पाऊसच अनुभवला. यासंदर्भात ‘लोकमत’शी संवाद साधताना एनईईआरआयचे संचालक राकेश कुमार म्हणाले, एका वर्षाच्या बदलाला हवामान बदलाचे श्रेय दिले जाऊ शकत नाही. मात्र ऋतुमानामध्ये दिसणारा बदल वैश्विक तापमानाकडे दिशानिर्देश करणारा आहे. हवामान अनिश्चित बनले असले तरी हिवाळा पूर्णपणे नाहीसा झाला असे म्हणता येणार नाही. या बदलामुळे वनस्पती, पिके तसेच रोगप्रणालीत बदल दिसेल, असेही ते म्हणाले.

नागपूर हवामान विभागाच्या सूत्रांच्या मते, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान खाली येऊन १० ते १२ अंशांच्या आसपास पोहोचले. उत्तरेकडून वारे येताना मध्य भारताला थंडीचा अनुभव येतो. मात्र त्याच वेळी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळ अभिसरण तयार झाल्याने आणि अरबी समुद्रामध्ये उत्तर-पश्चिम दिशेने येणारे वारे दक्षिण पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रोखले गेले. यामुळे यावर्षी हिवाळा अनुभवला नाही. तज्ज्ञांच्या मते, यावर्षी पुन्हा हिवाळा उशिरा होण्याची शक्यता आहे.

जागतिक तापमानवाढ २ अंशाच्या पुढे वाढल्यास हिंदुकुश हिमालयावरील हिमनग वितळतील. त्यामुळे संबंधित देशांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागण्याची शक्यता राहील.

...

कोट

हिमालयातील बर्फ वितळत असल्याने भारत आणि चीनमधील प्रमुख नद्यांमध्ये अखेरीस पाणी कमी होईल. उष्ण पाण्यामुळे चक्रीवादळ आणि उष्णकटिबंधीय वादळे वेगवान वाऱ्यासह अधिक वेगवान बनतात. वादळे उष्ण समुद्राच्या पाण्यापासून ऊर्जा आणतात. त्यामुळे मध्यम कमकुवत वादळापासून तीव्र आणि विध्वंसक वादळ होऊ शकते. भविष्यात भारतालाही याचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

- पेटेरी टॅलस, महासचिव, जागतिक हवामान संस्था

...

...

Web Title: Climate change affects the duration of the seasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app