‘क्लिक’ करा नागपूरचे सौंदर्य

By Admin | Updated: August 17, 2014 00:49 IST2014-08-17T00:49:43+5:302014-08-17T00:49:43+5:30

नागपूर म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान. ही समृद्ध भूमी जशी धार्मिकदृष्ट्या श्रद्धास्थानी आहे, तसेच संत्रानगरी आणि झिरो माईल यामुळे जगप्रसिद्ध असलेले नागपूर शहर भोसलेंच्या राजवटीचे प्रतीक समजले जाते.

Click 'Nagpur' beauty of Nagpur | ‘क्लिक’ करा नागपूरचे सौंदर्य

‘क्लिक’ करा नागपूरचे सौंदर्य

‘लोकमत’तर्फे छायाचित्र स्पर्धा : हौशी, व्यावसायिक छायाचित्रकारांना संधी
नागपूर : नागपूर म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान. ही समृद्ध भूमी जशी धार्मिकदृष्ट्या श्रद्धास्थानी आहे, तसेच संत्रानगरी आणि झिरो माईल यामुळे जगप्रसिद्ध असलेले नागपूर शहर भोसलेंच्या राजवटीचे प्रतीक समजले जाते. आपल्या या नागपूरचे अलौकिक सौंदर्य टिपण्यासाठी ‘लोकमत’ उमंग अंतर्गत छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त होणाऱ्या या स्पर्धेसाठी नागपूर जिल्ह्यातील निसर्गस्थळे, पर्यटनस्थळे असा विषय ठेवण्यात आला आहे. यात निवडल्या गेलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन लवकरच आयोजित करण्यात येईल. ही स्पर्धा हौशी आणि व्यावसायिक अशा दोन गटात होणार आहे. यातील छायाचित्राचा आकार ८ बाय १२ इंच असावा, त्याला पांढऱ्या रंगातील माऊंट असावेत. स्पर्धकांनी छायाचित्राला योग्य ते शिर्षक द्यावे तसेच त्यामागे आपले नाव लिहावे. छायाचित्रावर कोणतेही संगणकीय काम केलेले नसावे. स्पर्धेसाठी छायाचित्र निवडण्याचा अधिकार फक्त समितीचा असणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. स्पर्धेसाठी निवडलेली छायाचित्र प्रदर्शनात लावण्यात येतील. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास २ हजार आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास १ हजार रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले छायाचित्र २१ आॅगस्ट २०१४ पर्यंत ‘लोकमत’ इव्हेंट कार्यालय, रामदासपेठ, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, नागपूर येथे जमा करावे. (प्रतिनिधी)

Web Title: Click 'Nagpur' beauty of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.