शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:14 IST

‘चुकीच्या कारणांवर’ आधारित परताव्याचे दावे : शासनाची फसवणूक, राज्यभरातील हजारो शिक्षकांना हजर राहण्याचे खरमरीत समन्स

बालाजी देवर्जनकर -

नागपूर : ज्यांच्या हाती भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे, त्या ‘गुरुजीं’नाच स्वतःच्या आर्थिक व्यवहारांसाठी आयकर विभागाच्या दारात हजेरी लावावी लागत आहे. महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना आयकर कायद्याच्या ‘सेक्शन १३१ (१ ए)’अंतर्गत समन्स बजावण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.  आयकर विभागाच्या समन्समध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, शिक्षकांनी मूल्यांकन वर्ष २०२५-२६ आणि मागील वर्षांच्या आयकर विवरणपत्रांमध्ये ‘चुकीच्या कारणांवर’ आधारित परताव्याचे दावे केले आहेत. थोडक्यात, टॅक्स सेव्हिंगच्या नावाखाली नियमांचा गैरफायदा घेऊन शासनाला चुना लावण्याचा प्रयत्न झाला आहे. 

कार्यालयात हजर होण्याचे आदेश  आयकर विभागाने कलम १३१ (१ए) नुसार शिक्षकांना समन्स बजावले आहे. यामध्ये, शिक्षकांना सर्व ‘बुक्स ऑफ अकाऊंट्स’ (हिशेबाची पुस्तके) आणि कागदपत्रे घेऊन कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.  

शिक्षक सीए अन् टॅक्स कन्सल्टंट्सच्या दारात या समन्समुळे हजारो शिक्षक सीए आणि टॅक्स कन्सल्टंट्सच्या दारात उभे आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रवृत्तीमुळे प्रामाणिकपणे कर भरणारे शिक्षकही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्यभरातील काही सीएंकडे धाडी पडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला आहे.

केवळ शिक्षण विभागच नव्हे तर सरकारच्या इतर विभागातही हे प्रकार सुरू असून, ‘आयकर विभागा’चा मोर्चा तिकडेही वळणार अशी विश्वसनीय माहिती आहे. 

निदर्शनास आली अशी ‘हेराफेरी’बनावट भाडेपट्टी : ‘एचआरए’ (घरभाडे भत्ता) मध्ये सूट मिळविण्यासाठी अनेक शिक्षकांनी स्वत:च्या आई-वडिलांना किंवा जवळच्या नातेवाइकांना भाडे दिल्याच्या बनावट पावत्या सादर केल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्षात ते त्याच घरात राहतात. पण, कागदोपत्री भाडे दाखवून मोठी वजावट मिळवली जाते. बनावट गृहकर्ज प्रमाणपत्र : ज्यांनी गृहकर्ज घेतलेले नाही, अशांनीही कर्जावरील व्याजाच्या वजावटीचा लाभ घेतल्याची प्रकरणे तपासणीत समोर आली आहेत.डबल क्लेम : अनेक शिक्षकांनी एकाच गुंतवणुकीची (उदा. एलआयसी किंवा पीपीएफ) वजावट दोन ठिकाणी दाखवून अधिक ‘रिफंड’ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

बनावट वैद्यकीय खर्च : वैद्यकीय खर्चाच्या बनावट पावत्या जोडून किंवा अनावश्यक वजावटी दाखवून करपात्र उत्पन्न कमी दाखवण्याचा हा सर्रास प्रकार शक्षणक्षेत्रात फोफावला आहे. यामुळे ‘प्रामाणिकपणा’ आणि ‘टॅक्स प्लानिंग’च्या नावाखाली होणाऱ्या ‘चलाखी’चा बुरखाच फाटला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teachers Under Tax Radar for ITR Manipulation: Investigation Ongoing

Web Summary : Maharashtra teachers face scrutiny for allegedly claiming false ITR refunds. The Income Tax Department issued summons regarding discrepancies in tax-saving claims, including fraudulent HRA, home loan, and medical deductions. Authorities are investigating potential tax evasion across government departments.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय