देवलापार येथील प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:08 IST2021-03-24T04:08:53+5:302021-03-24T04:08:53+5:30
देवलापार : रामटेक तालुक्यातील देवलापार येथे अपर तहसीलदार कार्यालयाकरिता नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात राज्य ...

देवलापार येथील प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा
देवलापार : रामटेक तालुक्यातील देवलापार येथे अपर तहसीलदार कार्यालयाकरिता नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने कार्यवाही सुरु केली आहे.
१४ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव उदयसिंग यादव आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री नितीन राऊत यांना देवलापार येथे अपर तहसीलदार कार्यालयाकरिता नवीन स्वतंत्र प्रशासकीय इमारत बांधकाम मंजूर करण्याची विनंती केली होती. यास पालकमंत्र्यांनी दुजोरा दिला होता. यानंतर पालकमंत्र्यांनी महसूल मंत्र्यांना तशी पत्राद्वारे विनंती केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना १८ मार्च रोजी महसूल व वन विभागाच्या कक्ष अधिकारी श्वेता सावदेकर यांचे पत्र प्राप्त झाले आहे. यात नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाबाबत विहीत प्रस्ताव सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.
देवलापार अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्र रामटेक तालुक्याच्या लोकसंख्येच्या तुलनेने कमी असलीतरी भौगोलिकदृष्ट्या मोठे आहे. या अपर तहसीलदार कार्यालय क्षेत्रात एकूण १५८ गावे मोडतात. यातील ९८ गावे आदिवासी बहूल लोकसंख्येचे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात सध्या अप्पर तहसीलदार कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. परंतू येथील जागा अपुरी पडत असल्याने देवलापार येथे नवीन प्रशासकीय इमारतीची निर्मितीचे मागणी करण्यात आली होती.