ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटल्याने क्लीनर जखमी
By Admin | Updated: May 31, 2017 13:38 IST2017-05-31T13:38:28+5:302017-05-31T13:38:28+5:30
आमगावकडून अमरावतीकडे जाणारा ट्रक गोंदियाच्या रिंगरोडवर उलटल्याने त्यातील क्लीनर, विजय पाचे जखमी झाल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.

ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटल्याने क्लीनर जखमी
आॅनलाईन लोकमत
गोंदिया- समोरून अचानक आलेल्या ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात आमगावकडून अमरावतीकडे जाणारा ट्रक गोंदियाच्या रिंगरोडवर उलटल्याने त्यातील क्लीनर, विजय पाचे जखमी झाल्याची घटना येथे मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.
समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला वाचविण्याच्या नादात ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. अमरावतीच्या शासकीय गोदामात तांदूळ घेऊन चाललेल्या या ट्रकमधील सर्व गोण्या नंतर रस्त्याच्या कडेला उतरविण्यात आल्या. यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.