क्लिनरने लांबविले ८० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST2021-01-16T04:12:41+5:302021-01-16T04:12:41+5:30
नागपूर - ट्रकचालक हाततोंड धुवायला गेल्याची संधी साधून क्लिनरने ८० हजारांची रोकड लंपास केली. बाळा महाजन (वय २५) ...

क्लिनरने लांबविले ८० हजार
नागपूर - ट्रकचालक हाततोंड धुवायला गेल्याची संधी साधून क्लिनरने ८० हजारांची रोकड लंपास केली. बाळा महाजन (वय २५) असे चोरट्या क्लिनरचे नाव असून तो धुळे जिल्ह्यातील सिंदखेड येथील रहिवासी आहे.
धुळे जिल्ह्यातील सिंदखेडचे ट्रकचालक अतुल अशोक मेराळे (वय २७) क्लिनर महाजनसह ट्रक घेऊन कळमना मार्केटमध्ये आले. ट्रकचालक मेराळे यांनी कळमना मार्केट बाहेर असलेल्या वीज मंडळाच्या कार्यालयाजवळ ट्रक उभा केला आणि ते शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास फ्रेश व्हायला गेले. यावेळी त्यांनी ट्रकच्या कॅबिनमध्ये ८० हजारांची रोकड काढून ठेवली. आरोपी महाजनने ती रक्कम घेऊन पळ काढला. मेराळे परत आले तेव्हा आरोपी तेथे नव्हता. त्यांनी त्याला आजूबाजूला शोधले. बराच वेळ होऊनही तो परत आला नाही. त्यामुळे कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----