शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्क कॅपॅसिटी फीचा वाद; ‘केबल’धारकांपुढे दुहेरी पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 09:57 IST

पेड चॅनल विकत घेण्यापूर्वी १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे एकूण १५३.४० रुपये वसूल करण्याचे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिले आहे. फ्री टू एअरच्या नावाखाली पूर्वीच्या तुलनेत ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे १३० रुपयांची एमएसओ व केबल ऑपरेटर्समध्ये वाटणी

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेड चॅनल विकत घेण्यापूर्वी १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे एकूण १५३.४० रुपये वसूल करण्याचे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिले आहे. फ्री टू एअरच्या नावाखाली पूर्वीच्या तुलनेत ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येत आहे.तर दुसरीकडे पेड वाहिन्यांच्या प्रत्येक वाहिनीसाठी केबल ऑपरेटर्स नेटवर्क कॅपॅसिटी फीच्या नावाखाली दरमहा ८० पैसे वसूल करीत आहेत. ही वसुली ट्रायच्या निर्देशाविरुद्ध असून यामुळे ग्राहकांची दुहेरी फसवणूक होत आहे. याविरोधात ग्राहक संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. ट्रायच्या निर्देशानुसार प्रारंभीचे १३० रुपये एमएसओला मिळणार आहे. आपापसात केलेल्या रकमेच्या वाटणीत एमएसओचा ३५ रुपये तर केबल ऑपरेटर्सचा ९५ रुपयांचा वाटा आहे. त्यानंतरही केबल ऑपरेटर प्रति वाहिनी ८० पैसे आकारून ग्राहकांची फसवणूक करीत आहे. ग्राहकांना केबल सेवा स्वस्त आणि पारदर्शक मिळावी, या उद्देशाने ट्रायने दिलेल्या निर्देशाचे एमएसओ आणि केबल ऑपरेटर्स सर्रास उल्लंघन करीत आहे. याशिवाय १८ टक्के जीएसटीचा बोजा ग्राहकांवर पडणारच आहे. एकंदरीत पाहता ग्राहकांना केबल सेवा स्वस्तऐवजी महागच मिळणार आहे. अतिरिक्त शुल्क आकारणीमुळे ग्राहक संभ्रमात आहेत. ट्रायने कोण किती शुल्क आकारेल आणि त्यावर किती जीएसटी लागेल, याची माहिती प्रकाशित केल्यास ग्राहकांना सोयीचे होणार आहे.

नेटवर्क कॅपॅसिटी शुल्काची कोट्यवधींची वसुलीयूसीएन, जीटीपीएल, इन केबल आणि सिटी केबल अशा चार एमएसओच्या माध्यमातून केबल ऑपरेटर्सतर्फे ग्राहकांना केबल सेवा मिळते. चारही एमएसओचे नागपूर शहरात जवळपास सात लाख तर नागपूर जिल्ह्यात एकूण नऊ लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत.फ्री टू एअर वगळता प्रत्येक ग्राहकाकडे जवळपास ५० पेड वाहिन्या सुरू राहणार आहे. प्रति वाहिनीकरिता ८० पैसे नेटवर्क कॅपॅसिटी फी आकारणीची रक्कम दरमहा नागपूर शहरातून २ कोटी ८० लाख तर संपूर्ण जिल्ह्यातून ३ कोटी ६० लाख रुपये गोळा होणार आहे. ही कोट्यवधींची वसुली केबल ऑपरेटर्स थेट ग्राहकांच्या खिशात घात घालून करीत आहेत.फीची रक्कम कोणी किती घ्यावी, यावर एमएसओ आणि केबल ऑपरेटर्समध्ये वाद सुरू आहे. नेटवर्क कॅपॅसिटी फीची अवैध वसुली थांबविण्याकरिता ट्राय आणि सरकारला गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतरच ग्राहकांना पारदर्शक केबल सेवा मिळेल, असे ग्राहकांचे मत आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन