शहर विकासासाठी १०० कोटी देणार
By Admin | Updated: January 7, 2015 00:59 IST2015-01-07T00:59:03+5:302015-01-07T00:59:03+5:30
शहरातील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी महापालिका कार्यालयाच्या सदिच्छा भेटी प्रसंगी दिले.

शहर विकासासाठी १०० कोटी देणार
चंद्रशेखर बावनकुळे : मनपाला सदिच्छा भेट
नागपूर : शहरातील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी महापालिका कार्यालयाच्या सदिच्छा भेटी प्रसंगी दिले. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे स्वागत केले.
शहराची वाढती लोकसंख्या व होणारा विस्तार लक्षात घेता त्यांनी विकास कामासाठी हा निधी देण्याची ग्वाही दिल्याची माहिती बोरकर यांनी दिली. मनपा हद्दीत नव्याने समावेश करण्यात आलेल्या मौजा नरसाळा व हुडकेश्वर भागातील विकास कामासंदर्भात त्यांनी चर्चा केली. नरसाळा व हुडकेश्वर भागातील नागरी सुविधा व विकासासाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उपायुक्त आर.झेड.सिद्दीकी, संजय काकडे, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, अच्युत हांगे, यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)