शहर पोलीस दलात फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 03:30 IST2016-09-27T03:30:56+5:302016-09-27T03:30:56+5:30

शहर पोलीस दलातील तीन पोलीस उपायुक्त तसेच दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करून पोलीस

City police force shuffle | शहर पोलीस दलात फेरबदल

शहर पोलीस दलात फेरबदल

नागपूर : शहर पोलीस दलातील तीन पोलीस उपायुक्त तसेच दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करून पोलीस उपायुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी फेरबदलाच्या चर्चेला विराम दिला. ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित केलेल्या वृत्तावरही बदलीच्या घडामोडीने शिक्कामोर्तब झाले.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, जारी झालेल्या बदल्यांच्या यादीनुसार विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त इशू सिंधू यांची बदली गुन्हेशाखेच्या आर्थिक गुन्हे विभागात (ईओडब्ल्यू) उपायुक्त म्हणून करण्यात आली. त्यांच्याकडे पोलीस उपायुक्त मुख्यालय हा अतिरिक्त कार्यभार तसाच कायम राहणार आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त राकेश कलासागर यांची बदली परिमंडळ दोनचे उपायुक्त म्हणून करण्यात आली. तर, सोमवारी दुपारपर्यंत परिमंडळ दोनचे उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांची बदली विशेष शाखेचे उपायुक्त म्हणून करण्यात आली.
तीन उपायुक्तांसोबतच नंदनवनचे ठाणेदार सुनील महाडिक यांची बदली एमआयडीसीचे ठाणेदार म्हणून करण्यात आली. तर एमआयडीसीची जबाबदारी सांभाळणारे एम. डी. नलावडे यांची नंदनवनचे ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, लोकमतने रविवारच्या अंकात अतिरिक्त आयुक्त डॉ. सुहास वारके यांच्या बदलीच्या वृत्तासोबतच शहर पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर फेरबदल होणार असल्याचे तसेच काही ठाणेदारांच्या बदल्या होणार असल्याचे प्रकाशित केले होते. २४ तासातच लोकमतच्या या वृत्तावर बदलीच्या घडामोडींनी शिक्कामोर्तब केले. आणखीही काही ठाणेदारांच्या बदल्या होण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: City police force shuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.