लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चहाचे पैसे मागितले म्हणून सहा सशस्त्र गुंडांनी चहा टपरीचालकाला बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० वाजता ही संतापजनक घटना घडली.शैलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शैलेशचा नंदनवनमधील व्यंकटेश कॉलनीत टी स्टॉल आहे. त्याच्या टी स्टॉलवर नेहमी ग्राहकांची गर्दी असते. रविवारी रात्री शैलेश त्याचे मित्र रवी हेडावू आणि आदर्श सातपुते सोबत ग्राहकांना चहा व मॅगी बनवून देत असताना आरोपी आकिब ऊर्फ सोनू, गणेश, भोला, पीयूष आणि त्याचे दोन साथीदार आले. ते सर्व चहा पिले त्यानंतर शैलेशने त्यांना चहाचे पैसे मागितले असता आरोपींनी शैलेशला ‘तू यहां कबसे ठेला लगाता, हम यहा के दादा है, हमारे आदमी से कभी पैसे नही लेने का,’ असे म्हणत आरोपीने लोखंडी रॉडने शैलेशला मारहाण केली. एवढेच नव्हे तर तलवार काढून शैलेशला जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच हातातील चांदीचे कडे आणि गल्ल्यातील १४, ८०० रुपये हिसकावून घेतले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. उपचार करून घेतल्यानंतर शैलेशने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात नंदनवनमध्ये सशस्त्र गुंडांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 21:27 IST
चहाचे पैसे मागितले म्हणून सहा सशस्त्र गुंडांनी चहा टपरीचालकाला बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० वाजता ही संतापजनक घटना घडली.
नागपुरात नंदनवनमध्ये सशस्त्र गुंडांचा हैदोस
ठळक मुद्देमारहाण करून चहा टपरीवाल्याला लुटले : रोख आणि सोनसाखळी हिसकावून नेली