नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:09+5:302021-03-13T04:13:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटोल : पहिल्या टप्प्यात आराेग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर यांना काेविड लस दिल्यानंतर आता ६० वर्षांवरील ...

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटोल : पहिल्या टप्प्यात आराेग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर यांना काेविड लस दिल्यानंतर आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील आजारी रुग्णांना माेफत लस दिली जात आहे. काटाेल शहरासह तालुक्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रात ही लसीकरण माेहीम सुरू असून, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार अजय चरडे यांनी केले आहे.
तालुक्यातील येनवा, कचारीसावंगा व काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्रात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी लसीकरणाबाबत गैरसमज न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शासनातर्फे सुरू असलेल्या माेफत लसीकरणाबाबत नागरिक निरुत्साही दिसून येत आहेत. लसीकरणाबाबत गैरसमज न बाळगता नजीकच्या केंद्रावर नाेंदणी करून लस टाेचून घ्यावी. काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नागरिकांनी स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी अनावश्यक घराबाहेर पडू नये, प्रत्येकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असेही आवाहन तहसीलदार अजय चरडे यांनी केले आहे.