शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सिने गीतांची सुरेल मैफिल!

By admin | Updated: September 9, 2014 01:15 IST

शिक्षक हा समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. पण शिक्षकांकडे पाहण्याची दृष्टी मात्र शिक्षण देणारा अशीच असते. ते खरे असले तरी अनेक शिक्षकांमध्ये एक कलावंतही दडला असतो.

नागपूर : शिक्षक हा समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. पण शिक्षकांकडे पाहण्याची दृष्टी मात्र शिक्षण देणारा अशीच असते. ते खरे असले तरी अनेक शिक्षकांमध्ये एक कलावंतही दडला असतो. पण विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या पेशात त्यांच्यातला कलावंत दुर्लक्षित राहतो. पण विविध महाविद्यालयात अभियांत्रिकी, सायबर लॉ, कला, विज्ञान, वाणिज्य शिकविणाऱ्या शिक्षकांनी आज सुरेल गीते सादर करून त्यांच्यातील गानप्रतिभेचा परिचय दिला. या प्राध्यापकांची गीते ऐकताना आपण प्रथितयश गायक कलावंतांचीच गीते ऐकतो आहोत, असा अनुभव आज रसिकांनी घेतला. हार्मोनी इव्हेन्ट्सतर्फे शिक्षक दिनाच्या औचित्याने डॉ. देशपांडे सभागृहात ‘गुरुसाक्षात स्वरब्रह्म’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना राजेश समर्थ यांची होती. कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील डॉ. अविनाश श्रीखंडे, डॉ. नरेन्द्र कान्हे, डॉ. किशोर भोयर, डॉ. यासिन शेख, प्रा. संदीप तम्मेवार, डॉ. रिना साहा, प्रा. वैशाली उपाध्याय, प्रा. अहिंसा तिरपुडे यांनी गीतांच्या सादरीकरणाने रंगत आणली. कार्यक्रमाचा प्रारंभ अहिंसा तिरपुडेने ‘आईये मेहरबा..आणि पिया तो से नैना लागे रे...’ या गीताने केला. यासिन शेख यांनी मुकेशच्या आवाजातील ‘एक दिन बिक जायेगा...आणि जाने कहाँ गये वो दिन...’ ही गीते खास मुकेश स्टाईलने सादर करून उपस्थितांची दाद घेतली. नरेंद्र कान्हे यांनी ‘मेरे मितवा..., और इस दिल मे क्या रखा है...’ हे गीत सादर केले. रिना साहा यांनी ‘आगे भी जाने ना तू...., जाईये आप कहाँ...’ या गीताने कार्यक्रमाला रंग भरला. यावेळी सर्वच गायकांनी तयारीने सादरीकरण करताना ‘मुसाफिर हू यारो, ओ हंसिनी, आज से पहले, अजी ऐसा मौका फिर कहा मिलेगा..., तेरे मस्त मस्त दो नैन, दिल की नजर से’ आदी गीते सादर केली. वैशाली उपाध्ये आणि अहिंसा यांच्या गीतांना वन्समोअरची मागणी झाली. वैशाली उपाध्ये यांनी सादर केलेल्या ‘पिया बावरी आणि लग जा गले....’ या गीतांना रसिकांनी विशेष दाद दिली. (प्रतिनिधी)