ख्रिसमस काळातील रेल्वेगाड्या फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:44 PM2019-12-02T20:44:45+5:302019-12-02T20:47:55+5:30

ख्रिसमसला मुलांना शाळेतून सुट्या मिळतात. त्यामुळे बहुतांश पालक मुलांच्या सुट्या पाहून बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करतात. मात्र, २५ ते ३१ डिसेंबर या काळातील रेल्वेगाड्यांमधील बर्थची स्थिती पाहता जवळपास सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे.

In Christmas all trains full | ख्रिसमस काळातील रेल्वेगाड्या फुल्ल

ख्रिसमस काळातील रेल्वेगाड्या फुल्ल

Next
ठळक मुद्देवेटिंगची स्थिती : प्रवासाचे प्लॅनिंग करणाऱ्यांची निराशा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ख्रिसमसला मुलांना शाळेतून सुट्या मिळतात. त्यामुळे बहुतांश पालक मुलांच्या सुट्या पाहून बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करतात. मात्र, २५ ते ३१ डिसेंबर या काळातील रेल्वेगाड्यांमधील बर्थची स्थिती पाहता जवळपास सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे. यामुळे ख्रिसमसच्या सुट्यात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची निराशा होत आहे.
ख्रिसमसच्या काळातील रेल्वेगाड्यांमधील वेटिंगचा आढावा घेतला असता जवळपास सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे. यात मुंबईकडे जाणाऱ्या १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस स्लिपर ४४ ते १६०, थर्ड एसी ३७ वेटींग आहे. पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यात १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस स्लिपर १०९ ते १३२, थर्ड एसी ८३ वेटिंग, १२८४९ बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस स्लिपर २५, थर्ड एसी ३१ वेटिंग, १२१३० बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस स्लिपर ६३ ते ८८, थर्ड एसी ८५ वेटिंग, १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ स्लिपर १२६ ते १९४, थर्ड एसी १२७ वेटिंग, उत्तरेकडील गाड्यात १२६२५ केरळ एक्स्प्रेस स्लिपर ११८ ते १९५, थर्ड एसी ९१ वेटिंग, चेन्नईकडील गाड्यात १२६१६ जीटी एक्स्प्रेस स्लिपर १९, थर्ड एसी २९वेटिंग, १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेस स्लिपर क्लास आरएसी १५०, थर्ड एसी २२ वेटिंग, १२५११ राप्तीसागर एक्स्प्रेस स्लिपर क्लास २९ वेटिंग, थर्ड एसी १६ वेटिंग, १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस स्लिपर क्लास ३४ ते १४६ वेटिंग, थर्ड एसी ५४ वेटिंग, १२६५२ संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये वेटिंग २५ आहे. त्यामुळे क्रिसमसच्या काळातील रेल्वेगाडीचे आरक्षण करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. यामुळे प्रवाशांची निराशा होत असून त्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागणार आहे.

दलालांनी तिकिटे घेतल्याची शंका
दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात दलालांनी तिकिटे काढून ते ज्यादा दराने प्रवाशांना विकल्याची बाब उजेडात आली होती. दलालांनी केवळ तिकिटेच पुरविली नाही, तर प्रवाशांना बनावट आधारकार्डचा पुरवठाही केल्याचे आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईत स्पष्ट झाले होते. त्यामुळे ख्रिसमसच्या काळातही दलालांनी तिकिटे काढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ख्रिसमसच्या काळातही विशेष पथकाकडून तपासणी
‘ख्रिसमसच्या काळातील रेल्वेगाड्यांमध्ये विशेष पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. यात दलालांकडून तिकीट खरेदी केले असल्यास संबंधित प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’
-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

Web Title: In Christmas all trains full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.