समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST2020-11-26T04:21:47+5:302020-11-26T04:21:47+5:30
भंडारा : पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. समाजातील विविध समस्यांची जाणीव ठेवून त्यासंबंधी कार्य करणारा तो ...

समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या ()
भंडारा : पदवीधरांचा उमेदवार हा त्याच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवलेला असावा. समाजातील विविध समस्यांची जाणीव ठेवून त्यासंबंधी कार्य करणारा तो असावा. पदवीधरांनो आपला प्रतिनिधी म्हणून राजकारणी नाही तर समाजकारणी कार्यकर्त्याला निवडून द्या, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.
भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या मोहाडी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. लाखनी येथील प्रचारसभेत पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने सुद्धा पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी समर्थन दिले. संदीप जोशी यांनी लाखनी शहरातील समर्थ विद्यालयात दिवंगत बापूसाहेब चिखलीकर यांच्या स्मृतीला वंदन केले व शिक्षकवृंदांशी संवाद साधला.
विविध सभांमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, माजी राज्यमंत्री आमदार डॉ.परिणय फुके, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, भाजपा भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, गीता कोंडेवार, भाऊराव तुमसरे, डॉ. कल्याणी भुरे, डॉ. हिवराज जमीरवार, डॉ. गोविंद कोठाणी, मुन्नाभाऊ फुंडे, ॲड.आशिष कुबडे, ॲड. विजय पारधी, कुंदाताई वैद्य, मोहाडी येथे विकास फाऊंडेशनचे हंसराजजी आगाशे, यादवराव कुंभारे, अफरोज पठाण, माजी सभापती हरिशचंद्र बंदाटे, सेवक चिन्नलोरे, चंद्रशेखर भिवगडे, बंडूभाऊ बनकर, मेहताष ठाकूर, लाखनी येथे आल्हाद भांडारकर, मधुकर लाड, धनंजय घाटबांधे, भरत खंडाईत, शिक्षक परिषदेचे के.डी. रोकडे, महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे रवी रहांगडाले, साकोली येथे डॉ.ब्रह्मानंद करंजेकर, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, लखन बर्वे, रेखाताई भाजीपाले, सय्यद मुजानद्दीन, घनश्याम निखाडे आदी उपस्थित होते.
आमदार विनोद अग्रवाल यांचेही समर्थन
गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनीही संदीप जोशी यांना समर्थन देत विशाल लॉन येथे सभा घेतली.