‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली फसली

By Admin | Updated: August 14, 2016 02:29 IST2016-08-14T02:29:26+5:302016-08-14T02:29:26+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मागील वर्षी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली लागू करण्यात आली होती

The 'Choice Based Credit' system cropped up | ‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली फसली

‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली फसली

नागपूर विद्यापीठ : एकाही विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विषय निवडला नाही
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मागील वर्षी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली लागू करण्यात आली होती. या प्रणालीबाबत प्राध्यापकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर तर होताच.
परंतु विद्यार्थ्यांनीदेखील या प्रणालीला ठेंगा दाखविला आहे. विद्यापीठातील एकाही विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर शाखांच्या विषयांची निवड केलेली नाही. यंदापासून विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमात ही प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे विद्यापीठासमोरील आव्हान निश्चित वाढणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी काही वर्षांअगोदर पावले उचलली. विदेशातील विद्यापीठांप्रमाणे देशातील विद्यापीठातदेखील विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय शिकता यावे, यासाठी आयोगाने पुढाकार घेतला.

 

Web Title: The 'Choice Based Credit' system cropped up