शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात 'चिपको आंदोलन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 20:40 IST

शाळांच्या जागा भांडवलदार किंवा राजकीय नेत्यांच्या घशात जाऊ नये म्हणून शासनाला जागे करण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेकडो मुले व नागरिकांनी कवटाळले शाळेला : मोहल्ला सभा घेऊन पालकांशी संवाद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षात मराठी भाषिक सरकारी शाळांना घरघर लागली आहे. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या शाळा बंद पडत आहेत किंवा पटसंख्येचे कारण देत बंद पाडल्या जात आहेत. शाळांच्या या जागा भांडवलदार किंवा राजकीय नेत्यांच्या घशात जाऊ नये म्हणून शासनाला जागे करण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात शुक्रवारी शेकडो विद्यार्थी व पालकांनी जोगीनगर, रिंग रोडच्या भीमनगर मराठी प्राथमिक शाळेला कवटाळून शाळा वाचविण्यासाठी आपल्या संवेदना प्रकट केल्या.सरकारी शाळा वाचवा अभियानाअंतर्गत सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीतर्फे गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या लक्ष वेधण्यासोबत सामान्य नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. सुरूवातीला लाल शाळा आणि त्यानंतर सोमलवाडा येथील सरकारी शाळेत चिपको आंदोलन करण्यात आली. या अभियानाचा तिसरा टप्पा शुक्रवारी मानेवाडा रिंग रोडच्या जोगीनगर येथे सरकारी शाळेत पार पडला. वस्तीतील १५० च्यावर विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या शाळेला कवटाळून शाळा बंद करण्याचा महापालिका प्रशासनाच्या धोरणाचा निषेध केला. इंग्लिश मिडीयमच्या खासगी शाळांचे शुल्क भरमसाठ वाढले आहे, जे गरीब व मध्यमवर्गीय पालकांनाही परवडणारे नाही. पटसंख्येच्या कारणाने शहरातील महापालिकेच्या १९१ पैकी ५२ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या सरकारी शाळा बंद झाल्या तर गरीब मुलांचे शिक्षणच बंद होईल, त्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागेल, ही भीती या आंदोलनातून व्यक्त करण्यात येत आहे. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या शाळा बंद पडत आहेत. मात्र, मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या शाळा बंद पाडून कोट्यवधीच्या या जमिनी हडपण्याचे तर षडयंत्र असल्याची शंका संयुक्त कृती समितीने व्यक्त केले. या शाळा बंद होऊ नये व नागरिकांनी त्यासाठी समोर येउन लढण्यासाठी हे आंदोलन चालले असल्याचे कृती समितीचे संयोजक दीपक साने यांनी व्यक्त केले.

टॅग्स :agitationआंदोलनmarathiमराठीSchoolशाळा