शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

पुन्हा 'चिपको आंदोलन', पण यावेळी सरकारी शाळांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 20:49 IST

‘चिपको आंदोलन’या आंदोलनाची पुनरावृत्ती शुक्रवारी नागपुरात घडली. मात्र यावेळचे आंदोलन झाडांसाठी नाही तर सरकारी शाळा वाचविण्यासाठी होते.

ठळक मुद्देढासळणाऱ्या नागपुरातील लाल शाळेला चिपकले लोक : शाळा वाचविण्याचा अभिनव लढा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेव्हा उत्तर प्रदेशात येणाऱ्या आताच्या उत्तराखंड भागात १९७० साली अमर्याद वृक्षतोडीच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांनी ‘चिपको आंदोलन’ सुरू केले होते. सुंदरलाल बहुगुणा व इतर कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात महिलांच्या लक्षणीय सहभागामुळे आंदोलनाकडे जगभराचे लक्ष वेधले होते. या आंदोलनाची पुनरावृत्ती शुक्रवारी नागपुरात घडली. मात्र यावेळचे आंदोलन झाडांसाठी नाही तर सरकारी शाळा वाचविण्यासाठी होते. अभियानाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी तोडण्यात येणाऱ्या शहीद भगतसिंग लाल शाळेला घेराव करून चिपको आंदोलन केले आणि सरकारी शाळा वाचविण्यासाठी आवाज बुलंद केला.गेल्या काही वर्षात मराठी भाषिक आणि सरकारी शाळांना घरघर लागली असून महापालिका प्रशासनातर्फे पटसंख्येचे कारण देत एक एक शाळा बंद पाडण्यात येत आहे. अशाप्रकारे गेल्या वर्षी महापालिकेच्या तब्बल ५२ शाळा बंद करण्यात आल्या. वास्तविक या शाळांना काळाच्या गरजेनुसार आधुनिक मूलभूत आणि आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून मजबूत करण्याची गरज आहे, जेणेकरून त्या कॉन्वेंटच्या स्वरूपात असलेल्या खासगी शाळांसमोर टिकाव धरतील. मात्र असे न करता या शाळा सरसकट बंद पाडण्यात येत आहेत. एकिकडे खासगी शाळांचे शिक्षण अतोनात महाग असून गरीबच नाही तर मध्यम वर्गीय कुटुंबांनाही तो खर्च अवाक्याबाहेर होतो. अशावेळी सरकारी शाळा याच गरीब घरच्या मुलांसाठी शिक्षणाचा आधार ठरतात. या शाळाच बंद पडतील तर गरीब मुलांचे शिक्षणच थांबेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जागरूक पालक तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये अस्वस्थता पसरली आहे.अशा विविध संघटनांचे पदाधिकारी व जागरूक पालकांनी एकत्रित येउन ‘सरकारी शाळा वाचवा अभियान’ला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसह शुक्रवारी बंद पडलेल्या लोधीपुरा येथील शहीद भगतसिंग लाल शाळेच्या खंडित झालेल्या भिंतींना चिपकून आंदोलन केले. दीनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, दीपक साने, दुर्बल समाज घटक अभियानाचे धीरज भिसीकर, पत्रकार प्रमोद काळबांडे आदी सदस्यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. लोधीपुऱ्याच्या या लाल शाळेला ५० वर्षाच्या जवळपास झाले आहेत. १०-१२ वर्षापूर्वी ती बंद पडली होती. त्यानंतर तेथे प्लॅटफार्मवर भटकणाऱ्या आणि गुन्हेगारी जगताकडे वळू पाहणाऱ्या मुलांसाठी प्लॅटफार्म शाळा सुरू करण्यात आली होती.या शाळेला सामाजिक उद्देशात यश येत असतानाच ती पुन्हा बंद करण्याचा निर्णय झाला. मिळालेल्या माहितीनुसार या जागेवर व्यापारी संकुल, त्यावर सांस्कृतिक संकुल व त्यावर ई-लायब्ररी तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून शाळा पाडण्याचे कामही सुरू झाले आहे.दीनानाथ वाघमारे म्हणाले, या सरकारी शाळा गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा आधार आहेत. या शाळा बंद करून गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र या विशिष्ट व्यवस्थेद्वारे रचले जात आहे. महापालिकेच्या शाळांना बंद करून ती जागा हडपण्याचे किंवा शासकीय अधिकारांचा फायदा घेउन काम काढण्याचे प्रयत्न स्थानिक नेते व बिल्डर्सकडून सुरू असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला. यांच्याविरोधात जनशक्ती उभी राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ही शाळा तोडण्याचे काम त्वरित थांबविण्यात यावे व पूर्ववत तिचे वैभव निर्माण करावे, अशी मागणी त्यांनी केली. बंद पडलेल्या इतरही शाळांसाठी टप्प्याटप्प्याने ‘चिपको आंदोलन’ करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agitationआंदोलनSchoolशाळाnagpurनागपूर