शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील चिंतलवार-माया टोळीचे गुंड हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:50 IST

विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि अजनी, सक्करदरा भागात प्रचंड दहशत पसरविणाऱ्या कुख्यात चिंतलवार आणि माया टोळीच्या प्रमुखासह चार खतरनाक गुंडांना पोलिसांनी हद्दपार केले.

ठळक मुद्देचार गुंडांना दोन वर्षांसाठी नागपूर जिल्ह्यात वावरण्यास बंदी

आॅनलाईन लोकमतनागपूर : विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि अजनी, सक्करदरा भागात प्रचंड दहशत पसरविणाऱ्या कुख्यात चिंतलवार आणि माया टोळीच्या प्रमुखासह चार खतरनाक गुंडांना पोलिसांनी हद्दपार केले.चिंतलवार टोळीचा प्रमूख गुंड सुमित रमेश चिंतलवार (वय २९, रा. विश्वकर्मानगर,अजनी), शुभम ऊर्फ पेठ्या सुरेश गजघाटे (वय २५, रा. सावित्रीबाई फुलेनगर) तसेच माया टोळीचा प्रमुख शुभम ऊर्फ बबलू मनोहर फुलझेले (वय २४, रा. रामबाग) आणि त्याचा साथीदार पवन दयाराम चौधरी (वय २३, रा. गजानन अपार्टमेंट, बेसा पॉवर हाऊस जवळ, हुडकेश्वर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.उपरोक्त दोन्ही गुंडांच्या टोळ्यांची अजनी, सक्करदरा आणि आजूबाजूच्या भागात प्रचंड दहशत आहे. त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, पिस्तुलातून गोळीबार, घातक शस्त्राच्या धाकावर अपहरण, मारहाण, खंडणी वसुली, दंगे करण्यासह विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारीवृत्तीत फरक पडत नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडून कुणाच्याही जानमालाला धोका होऊ शकतो, हे लक्षात घेऊन परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी या चार गुंडांना एकसाथ हद्दपार करण्याचे आदेश बजावले.पोलिसांचे आवाहननागपूर शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता त्यांच्यावर हद्दपारीचा आदेश आहे. या कालावधीत हे किंवा त्यांच्यापैकी कोणताही गुंड नागपुरात अथवा आजूबाजूच्या गावात आढळल्यास तातडीने १०० क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. फोन करणाऱ्याचे   नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरcrimeगुन्हे