चीनचे वाणिज्यदूत झेंग झीयुआन यांनी सोमवारी दिली नागपूर विधानभवनास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:27 IST2017-12-11T20:26:17+5:302017-12-11T20:27:02+5:30
विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत झेंग झीयुआन यांनी उच्चाधिकाºयांच्या शिष्टमंडळासह सोमवारी येथील विधानभवनास भेट दिली.

चीनचे वाणिज्यदूत झेंग झीयुआन यांनी सोमवारी दिली नागपूर विधानभवनास भेट
ठळक मुद्देप्रेक्षक कक्षातून पाहिले कामकाज
ऑनलाईन लोकमत
नागपूर : विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत झेंग झीयुआन यांनी उच्चाधिकाºयांच्या शिष्टमंडळासह सोमवारी येथील विधानभवनास भेट दिली.
विधान परिषदेत तसेच विधानसभेत प्रेक्षक कक्षातून त्यांनी सभागृहाचे कामकाज पाहिले. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याबाबत घोषणा करून सभागृहाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.