खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:03+5:302021-02-16T04:10:03+5:30

बुटीबाेरी : बांधकाम सुरू असलेल्या परिसरात खेळत असलेली चिमुकली खाेदकाम केलेल्या खड्ड्यात पडली व खड्ड्यातील पाण्यात बुडाल्याने तिचा उपचारादरम्यान ...

Chimurdi dies after falling into a pit | खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

बुटीबाेरी : बांधकाम सुरू असलेल्या परिसरात खेळत असलेली चिमुकली खाेदकाम केलेल्या खड्ड्यात पडली व खड्ड्यातील पाण्यात बुडाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्यांतर्गतच्या वारंगा लाॅ काॅलेज युनिव्हर्सिटी येथे रविवारी (दि.१४) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. बिनाेता बिबास बिश्वास (२ वर्ष, रा. भूगाव, ता. कामठी) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. बिनाेता ही बांधकाम सुरू असलेल्या परिसरात खेळत हाेती. दरम्यान, अचानक ती सांडपाणी साठविण्यासाठी खाेदलेल्या खड्ड्यात पडली आणि खड्ड्यातील पाण्यात बुडाली. लागलीच तिला बुटीबाेरी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. याप्रकरणी रमेश श्यामराव भाेयर (वय ४६, रा. बुटीबाेरी) यांच्या तक्रारीवरून बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार धवराळ करीत आहेत.

Web Title: Chimurdi dies after falling into a pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.