वडिलांच्या कडेवरून पडलेल्या चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:45+5:302021-04-05T04:07:45+5:30
नागपूर : वडिलांच्या कडेवर बसून एका झोपड्यातून दुसरीकडे जात असताना अंधारात पाय अडखळून वडिलांसह खाली पडल्यामुळे चार वर्षांची चिमुकली ...

वडिलांच्या कडेवरून पडलेल्या चिमुकलीचा मृत्यू
नागपूर : वडिलांच्या कडेवर बसून एका झोपड्यातून दुसरीकडे जात असताना अंधारात पाय अडखळून वडिलांसह खाली पडल्यामुळे चार वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरतवाडा परिसरात ही घटना घडली.
पायल प्रेमदास कुंभरे असे चार वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. ३० मार्चला रात्री १० च्या सुमारास चिमुकली पायल तिच्या वडिलांच्या कडेवर बसून एका झोपड्यातून दुसऱ्या झोपड्याकडे जात होती. अंधार असल्याने खड्ड्यात पाय पडल्यामुळे प्रेमदास कुंभरे यांचा तोल गेला. त्यामुळे ते मुलीला घेऊन खाली पडले. पायलच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. चिमुकल्या पायलच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
---