Chimukali was strangled to death by her father | वडिलानेच केली चिमुकलीची गळा चिरून हत्या

वडिलानेच केली चिमुकलीची गळा चिरून हत्या

बुटीबोरी : पती-पती पत्नीच्या आपसी वादातून जन्मदात्या पित्यानेच दोन वर्षांच्या चिमुकलीची ब्लेडने गळा चिरून हत्या केली. यासोबतच त्याने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुटीबोरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशपूर येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. राधिका किशोर सयाम (२) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. किशोर सयाम (४०) असे आरोपी नराधम पित्याचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार, किशोर हा पत्नी पूजा (३०)आणि दोन वर्षांची मुलगी राधिकासह गणेशपूर येथे दास यांच्याकडे किरायाने राहत होते. ते मूळचे उमरवाही, ता. सिंदेवाही, जि.चंद्रपूर येथील राहणारे आहेत. काही दिवसापासून किशोर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दारू पिऊन मारहाण करायचा. नेहमी सोडचिठ्ठीची मागणी करायचा. सोमवारी तो सकाळपासून दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करीत होता. याची तक्रार देण्यासाठी पूजा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली तेव्हा राधिका आणि आरोपी किशोर घरीच होते.

पत्नी जेव्हा पोलिसांना घेऊन घरी गेली तेव्हा मुलगी राधिका ही रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. किशोरदेखील जखमी अवस्थेत होता. पोलिसांनी तत्काळ मुलीला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपी किशोरला नागपूर येथील रुग्णालयात रवाना करून घटनेची नोंद करण्यात आली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Web Title: Chimukali was strangled to death by her father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.