वडील व भावाची हत्या करून मुलाची आत्महत्या

By Admin | Updated: July 9, 2014 13:37 IST2014-07-09T12:57:42+5:302014-07-09T13:37:38+5:30

कौटुंबिक वादातून एका मुलाने आपले वडील व सख्ख्या लहान भावाची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया येथे घडला.

Child's suicide by killing father and brother | वडील व भावाची हत्या करून मुलाची आत्महत्या

वडील व भावाची हत्या करून मुलाची आत्महत्या

ऑनलाइन टीम
गोंदिया, दि. ९ - कौटुंबिक वादातून एका मुलाने आपले वडील व सख्ख्या लहान भावाची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोंदियातील सुंदरनगर येथे राहणा-या गणेश मदन मिश्रा (वय २५) याने बुधवारी सकाळी वडील मदन चिमण मिश्रा ( वय ५०) व लहान भाऊ विकास मेश्राम हे झोपलेले असताना त्यांची लोखंडी रॉडने हत्या केली. त्यानंतर त्यांने स्वत:च्या खोलीत जाऊन गळाफास लाऊन घेत आत्महत्या केली. 
गणेश व त्याच्या पत्नीचा काही दिवसांपासून वाद सुरू होता, त्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. याच कारणावरून गणेशचा त्याच्या वडिलांशीही भांडण झाल व रागाच्या भरात त्याने वडील व भावाला ठार मारले व त्यानंतर स्वत:चेही जीवन संपविले. 
 

 

Web Title: Child's suicide by killing father and brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.