मुलांच्या शारीरिक, मानसिक प्रश्नांची उकल होणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:36+5:302021-02-05T04:45:36+5:30
नागपूर : भारतात २५ टक्के लोकसंख्या ही किशोरवयीन तरुणांची आहेत. १२ ते १९ वयोगटातील या मुलांपुढे अनेक गहन प्रश्न ...

मुलांच्या शारीरिक, मानसिक प्रश्नांची उकल होणे आवश्यक
नागपूर : भारतात २५ टक्के लोकसंख्या ही किशोरवयीन तरुणांची आहेत. १२ ते १९ वयोगटातील या मुलांपुढे अनेक गहन प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शाळा, महाविद्यालयात मिळत नाहीत. त्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळणे, त्यांच्या शारीरिक व मानसिक प्रश्नांची उकल वेळेत व अचूकपणे होणे आवश्यक आहे, असा सूर अॅडोलसंट हेल्थ अकॅडमीच्या पदग्रहण सोहळ्यात तज्ज्ञांद्वारा उमटला.
बालरोगतज्ज्ञांच्या अकॅडमीच्या ऑफ पेडियाट्रिक्सची महत्त्वपूर्ण शाखा अॅडोलसंट हेल्थ अकॅडमीच्या पदग्रहण सोहळ्यात कमलाकर देवघरे यांनी अध्यक्षपदाचा, तर डॉ. लीनेश यावलकर यांनी सचिव पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी आयोजित विविध विषयांवरील कार्यशाळेत तज्ज्ञांनी किशोरवयीन मुलांची समस्या व आरोग्यावर मार्गदर्शन केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याचवेळी डॉ. एम. एस. रावत, डॉ. निशिकांत कोतवाल, डॉ. उदय बोधनकर, डॉ. वसंत खळतकर, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. अनिल राऊत, डॉ. जयंत पंढरीकर, डॉ. आर. जी. पाटील, डॉ. राजीव मेहता, डॉ. शुभदा खिरवडकर, डॉ. मुस्तफा अली, डॉ. अभिजीत भारद्वाज, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. वैदेही मराठे, डॉ. जया शिवलकर, डॉ. प्राजक्ता कडुस्कर, डॉ. कमलाकर देवघरे, डॉ. सुमेरा खान, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. रवी आकरे, डॉ. शशांक शिरसागर, डॉ. सोनिया अरोरा, डॉ. भाग्यल राजन, डॉ. प्रीतम चांडक, डॉ. थरवानी, डॉ. संजय रत्नपारखी आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत डॉ. स्वाती भावे, डॉ. शुभदा खिरवडकर यांनी मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष डॉ. स्वाती वाघमारे व सचिव डॉ. प्राजक्ता कडुस्कर यांनी नवीन चमूकडे पदभार सोपविला.