बालकाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 1, 2016 02:57 IST2016-05-01T02:57:35+5:302016-05-01T02:57:35+5:30
कळमना भरतवाडाच्या धरमनगरातून एक १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक बेपत्ता झाला आहे.

बालकाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल
नागपूर : कळमना भरतवाडाच्या धरमनगरातून एक १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक बेपत्ता झाला आहे.
प्लॉट क्रमांक १७८ येथील रहिवासी राहुल सुभाष गंगोत्री १७ एप्रिलला दुपारी १२ वाजता आपली आई राधा गंगोत्री हिला कामावर जात असल्याची माहिती देऊन घरातून निघाला.
त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा पत्ता लागला नसल्यामुळे कळमना पोलिसात तक्रार दिली.
कळमना पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)