शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सतर्क 'टीसीं'मुळे मुलांचे भवितव्य सुरक्षित; गुन्हेगार पोहचले कोठडीत

By नरेश डोंगरे | Updated: June 7, 2025 18:27 IST

कर्तव्यासोबत सामाजिक दायित्वाचेही भान : दपूम रेल्वेचे तिकिट तपासणीस सन्मानित

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : सतर्कता, संवेदनशिलता आणि निष्ठा या त्रिसूत्रीला लक्षात ठेवून कर्तव्य बजावल्यास प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करता येते आणि अडचणीत सापडलेल्यांना मदतही करता येते. याचा प्रत्यय दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्चेच्या 'टीसींनी' बजावलेल्या कामगिरीतून आला आहे. कर्तव्य बजावतानाच त्यांनी दाखविलेल्या संवेदनशिलतेमुळे अनेक अल्पवयीन बालकांचे भविष्य सुरक्षित राहिले आणि गुन्हेगारांवर कडक कारवाईदेखिल होऊ शकली.

रेल्वेला आर्थिक फटका देणाऱ्या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी रेल्वेच्या तिकिट तपासणीसांवर (टीसींवर) असते. मात्र, हे करतानाच त्यांनी सतर्कता आणि संवेदना बाळगल्यास अनेकांना दिलासा मिळू शकतो. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या तिकिट तपासणीसांनी अशीच सतर्कता दाखविल्यामुळे घर सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या किंवा फूस लावून पळवून नेल्या जात असलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांना त्यांच्या आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आले. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गांजा, दारूसह अंमली पदार्थांची तस्करी करणारांनाही पकडण्यात यश आले. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमध्ये शिरून दर्जाहिन खाद्यपदार्थ तसेच पाण्याच्या बाटलीसह विविध शितपेय विकणाऱ्या अनधिकृत वेंडर्सवरही सतर्क टीसींमुळेच कारवाई करण्यात यश मिळाले.

अशा प्रकारे कर्तव्य बजावतानाच सामाजिक दायित्व पार पाडणाऱ्या दपूम रेल्वेच्या २८ तिकिट तपासणीसांच्या कार्याची दखल घेऊन दपूम रेल्वेचे व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांनी सत्कार केला. दपूम रेल्वेच्या स्थानिक सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यांचा झाला सत्कारआय. आलम, ए. आर. राहटे, संजय गौरव, अजय राहटे, सतीश घोरपडे, मिथिलेश कुमार, संतोष बावनथडे, शिखा यादव, रश्मी सार, जी. किशोर, सुरेश कुमार साहु, श्री राजकुमार, राजेश पी. रामटेके, नरसिंह नारायण दास, जी. एम. झा, एस. बी. दुपारे, बी. कुमार, डी.आर.पांडे , एस. डी. सोलोमन, प्रभू चौरसिया, सागर थुल, नितिन इंदुरकर, शैलेन्द्र प्रसाद, तुषार सहारे, आर. के. ठाकुर, मुकुल. पी. कुजुर, एम. के. अग्रवाल, नीरज यादव, सुधीर कुमार.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर