बालकांच्या कलाविष्कारात रंगतोय चिल्ड्रन कार्निव्हल
By Admin | Updated: November 14, 2016 03:02 IST2016-11-14T03:02:58+5:302016-11-14T03:02:58+5:30
विविध वयोगटातील चिमुकल्यांनी अप्रतिमरीत्या सादर केलल्या एकल नृत्याचा निखळ आनंद श्रोत्यांना रविवारी अनुभवायला मिळाला.

बालकांच्या कलाविष्कारात रंगतोय चिल्ड्रन कार्निव्हल
ट्रॅफिक पार्कमध्ये उसळली गर्दी : आज पारितोषिक वितरण
नागपूर : विविध वयोगटातील चिमुकल्यांनी अप्रतिमरीत्या सादर केलल्या एकल नृत्याचा निखळ आनंद श्रोत्यांना रविवारी अनुभवायला मिळाला. सोबतच बालकदिनावर आधारित बालकांनी रेखाटलेली चित्र पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. निमित्त होते लोकमत कॅम्पस क्लब आणि दिल्ली पब्लिक स्कूल नागपूर सिटीच्यावतीने आयोजित ‘चिल्ड्रन्स कार्निव्हल’चे.
धरमपेठ येथील चिल्ड्रन ट्रॉफिक पार्क येथे रविवारी कार्निव्हलला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येत मुले आणि पालकांनी गर्दी केली. या कार्निव्हलचा मुलांना जास्तीत जास्त आनंद मिळण्यााठी फूड जॉय, टॉय ट्रेन, विविध खेळ सोबतच मोफत टॅटू, क्ले पॉट मेकिंग व राईड्स उपलब्ध करून देण्यात आले. या सर्वांचा मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. ‘कार्निव्हल’च्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, नगरसेवक विशाखा मैंद, माजी नगरसेवक बाबा मैंद, दिल्ली पब्लिक स्कूल नागपूर सिटीचे व्यवस्थापन सदस्य गौतम राजगढिया, प्राचार्य अनुपमा सगदेव आणि एसडीपीएलचे गौरव अग्रवाला उपस्थित होते.
कार्निव्हलच्या पहिल्या दिवशी एकल नृत्य आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण चेतन देशभ्रतार, पूनम आष्टनकर, दीपक घाडगे, नेहा परोहा आणि जतिन खांडवानी यांनी केले. कार्निव्हलच्या दुसऱ्या व अंतिम दिवशी सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कार्निव्हलला सुरुवात होईल. यात मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात येईल. सोबतच पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार वितरित करण्यात येईल. कार्यक्रमाचे संचालन प्रमेय लोखंडे आणि नेहा जोशी यांनी केले. रविवारी काढण्यात आलेल्या ‘लकी ड्रॉ’मध्ये शर्विल मेश्राम, वेदिका धांदले आणि अंश रंधे आदी भाग्यवंतांचा समावेश होता. (प्रतिनिधी)