शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात बालमृत्यूचा दर घसरतोय : आरोग्यमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:19 IST

राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्देइस्पितळात दाखल नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण ८ टक्क्यांवर

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. हेमंत टकले, शरद रणपिसे, संजय दत्त इत्यादी सदस्यांनी या मुद्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती.केंद्र शासनाच्या ‘एसआरएस’ या सर्वेक्षणानुसार राज्यातील बालमृत्यूचा दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. नवजात बालकांवर उपचारासाठी राज्यात त्रिस्तरीय योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्रसूतीगृह व शस्त्रक्रियागृहामध्ये ‘न्यू बॉर्न केअर कॉर्नर’, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयस्तरावर ‘न्यू बॉर्न स्टॅबिलायझेशन युनिट’ आणि जिल्हा रुग्णालयस्तरावर ‘स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट’ कार्यरत आहे. राज्यात सद्यस्थितीत ३६ ‘एसएनसीयू’ कार्यान्वित असून, दरवर्षी ५० हजारांहून अधिक बालकांवर उपचार करण्यात येतात. २०११-१२ मध्ये येथील मृत्यूंचे प्रमाण १२ टक्के इतके होते. आॅक्टोबर २०१७ मध्ये हेच प्रमाण ८ टक्क्यांवर आले असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.नाशिकमध्ये आॅगस्ट महिन्यात ३४५ नवजात बालके दाखल झाली व यातील ५५ बालकांचा मृत्यू झाला. अपुऱ्या दिवसाचे बाळ, जन्मत: श्वसनावरोध, श्वसनाचा आजार, जंतूसंसर्ग इत्यादी कारणांमुळे हे मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Healthआरोग्य