महिला दिनाला थांबविला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:42+5:302021-03-09T04:09:42+5:30

नागपूर : सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा बालसंरक्षण कक्षाने अल्पवयीन मुलामुलींचा होणार बालविवाह थांबविला. मंगळवारी हा विवाह कोंदामेंढी येथे ...

Child marriage stopped on Women's Day | महिला दिनाला थांबविला बालविवाह

महिला दिनाला थांबविला बालविवाह

नागपूर : सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा बालसंरक्षण कक्षाने अल्पवयीन मुलामुलींचा होणार बालविवाह थांबविला. मंगळवारी हा विवाह कोंदामेंढी येथे होणार होता. पण महिला दिनाच्या दिवशीच पोलीस, बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी लग्नाचे घर गाठून बालविवाह थांबविला. ही बाब अख्ख्या गावात पसरल्यानंतर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेऊन अल्पवयीन मुलामुलींचे विवाह गावात होणार नाही, असा ठराव पारीत केला.

मुलीबरोबर मुलगाही अल्पवयीन होता. गावातील अंगणवाडीसेविकेने या विवाहाची माहिती बालसंरक्षण कक्षाला दिली. महिला व बालकल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी हा विवाह थांबविण्यासाठी बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, माधुरी खोब्रागडे, विनोद शेंडे, साधना हटवार यांच्या पथकाला गावात पाठविले. पोलिसांच्या मदतीने हा विवाह रोखण्यात आला. मुलीच्या कुटुंबाचे समुपदेशन करून मुलीचे वय जोपर्यंत १८ वर्ष होणार नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, असे बंधपत्र लिहून घेतले.

Web Title: Child marriage stopped on Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.