शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दहावीची परीक्षा आटोपताच नातीला बोहल्यावर चढवण्याचा बेत; बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला अनर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 16:49 IST

पीडित मुलीचे आईवडील विभक्त राहतात. ती आजी-आजोबांकडे राहते. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे.

ठळक मुद्देआई-वडील विभक्त; आजी-आजोबा लावत होते विवाह

नागपूर : लहानपणापासून तिच्या वाट्याला आनंदाचे क्षण आलेच नाहीत. थोडं समजायला लागलं तर आई-वडील कौटुंबिक वादातून विभक्त झाले. आजी-आजोबाने पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, या जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी दहावीची परीक्षा आटोपताच तिचे लग्न लावून देण्याचा बेत आखला. बोहल्यावर चढण्याच्या एक दिवसापूर्वी  सुदैवाने शासकीय पथक तिच्या घरी धडकले व बालविवाह रोखला.

तिचा विवाह शुक्रवारी मध्यप्रदेशातील लांजी येथील मुलासोबत जरीपटका परिसलात होणार होता. चाईल्ड लाईनद्वारे ही माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाल्यानंतर जरीपटका भागात राहत असलेल्या मुलीच्या घरी पथकाने धडक दिली. मुलीच्या वयाचे कागदपत्र तपासले असता ती १६ वर्षांची असल्याचे निदर्शनास आले. पथकाने बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून बालविवाह थांबविला. जोपर्यंत मुलीचे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न लाऊ नये. अन्यथा बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, अशी समज आजी-आजोबांना देण्यात आली. 

दरम्यान, गेल्या दीड वर्षात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने पंधरावर बालविवाह थांबविले आहेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या कारवाईत बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, विनोद शेंडे, साधना ठोंबरे, पोलीस निरीक्षक रुपाली फटींग, मुख्य सेविका दीपाली पवार, सारिका बारापात्रे, स्नेहलता गजभिये, वनिता नंदेश्वर आदी सहभागी होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नnagpurनागपूर