बच्चे कंपनी पायाला पंख बांधून उडाले मुंबईला!
By Admin | Updated: July 4, 2014 01:12 IST2014-07-04T01:12:58+5:302014-07-04T01:12:58+5:30
रामवृक्ष बेनीपरी यांनी २०-२५ वर्षांपूर्वी ‘पायाला पंख बांधून’ हा निबंध लिहिला होता. या निबंधात त्यांनी आपल्या पहिल्या विमान प्रवासाचे वर्णन केले होते. त्यावेळी अनेक मुले त्या निबंधाला वाचून आनंदित

बच्चे कंपनी पायाला पंख बांधून उडाले मुंबईला!
बालविकास मंच : सदस्यांची हवाई सहल सफर
नागपूर : रामवृक्ष बेनीपरी यांनी २०-२५ वर्षांपूर्वी ‘पायाला पंख बांधून’ हा निबंध लिहिला होता. या निबंधात त्यांनी आपल्या पहिल्या विमान प्रवासाचे वर्णन केले होते. त्यावेळी अनेक मुले त्या निबंधाला वाचून आनंदित झाली होती. मात्र २०१४ मध्ये शाळेतील मुलांना फक्त निबंध वाचून संतुष्ट होण्याची गरज नाही. त्यांना या अनुभवाला जगण्याची संधी ‘लोकमत बाल विकास मंच’ने उपलब्ध करून दिली आहे.
लकी ड्रॉ च्या माध्यमातून विमान प्रवासासाठी १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. २८ जूनच्या सकाळी आपल्या शाळेतील बॅगमध्ये फक्त टिफीन आणि एक जोडी कपडे घेऊन हे सर्व विद्यार्थी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर तयार होते. मुले विमानात बसली. आकाशात विमान विशिष्ट उंचीवर आले होते. टिफीन बॉक्स उघडल्या गेले. केळ, बिस्किट, चॉकलेट आणि इतर खाद्य वस्तूंचा आनंद घेण्यात आला. यात कोणी गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर येथील होतील. काही वेळातच ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहचले. येथे मुंबई बालविकास मंचचे संचालक रविशंकर पिल्लई यांनी मुलांचे स्वागत केले आणि मुंबई दर्शनाला सुरुवात झाली.
जसलोक एन्टीलिया, अंबानी यांचे घर, लता मंगेशकर यांचे घर, स्टेडियम, काला घोडा, प्रदर्शन, महालक्ष्मी टेम्पल, सिद्धीविनायक मंदिर, हाजीअली, राणी बाग आणि खूप काही. मुंबईच्या वर्दळीतून गेट वे आॅफ इंडियापर्यंत पोहचताना बराच वेळ लागला.येथील ऐतिहासिक महत्त्वाची माहिती घेतल्यानंतर नवीन आणि जुन्या हॉटेल ताजची माहिती देण्यात आली. नंतर गिरगाव चौपाटीच्या रेतीवर मुलांनी खूप मस्ती केली. या मुलांमध्ये एक सर्वात कमी वयाची म्हणजे सात वर्षाची स्वरा आगलावे होती. ती तिचा बोर्इंग पास स्वत:जवळच घेऊन बसायची. सगळे तिला म्हणायचे मॅडमकडे दे पण ती त्यांना उत्तर द्यायची मला सांभाळता येतो बोर्इंग पास. या छोट्याशा समूहात नागपूरातून अर्णव बक्षी, गोंदिया येथून वेदांती मस्के, भंडारा येथून स्वरा आगलावे, अमरावती येथून धरती मालपे, गडचिरोली येथून अनुराग टेकाम, चंद्रपूर येथून वेदांत बाकडे या सर्वांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे अनुशासन. छोट्यांची काळजी श्रेयस भिवगडे, सुजल गुप्ता, वेदांत बाराहाते, गौरव योगेश राऊत, ओबाक्षा राऊत, हर्षल आंबटकर या मोठ्या मुलांनी घेतली.(प्रतिनिधी)