बालकाचा खड्ड्यात पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:12+5:302021-07-12T04:07:12+5:30

माैदा : खड्ड्याच्या काठावर खेळत असताना ताेल गेल्याने १० वर्षीय बालक पाण्यात पडला आणि पाेहता येत नसल्याने त्याचा खड्ड्यातच ...

The child fell into the pit and died | बालकाचा खड्ड्यात पडून मृत्यू

बालकाचा खड्ड्यात पडून मृत्यू

माैदा : खड्ड्याच्या काठावर खेळत असताना ताेल गेल्याने १० वर्षीय बालक पाण्यात पडला आणि पाेहता येत नसल्याने त्याचा खड्ड्यातच बुडून मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघाेरी (काळे) शिवारात घडली.

संजय राजहंस चाैधरी (१०, रा. दिघाेरी काळे, ता. कामठी) असे या बालकाचे नाव आहे. दिघाेरी (काळे) शिवारात रेल्वेचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी खाेल खड्डे खाेदण्यात आले आहे. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. संजय बुधवारी सकाळी त्याच्या मित्रांसाेबत खड्ड्याच्या काठावर खेळत असताना त्याचा ताेल गेला आणि ता. खड्ड्यात पडला. त्यात खाेल पाणी असल्याने तसेच त्याला पाेहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी माैदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, अधिक तपास पाेलीस हवालदार प्रशांत काळे करीत आहेत.

Web Title: The child fell into the pit and died