बाल सुधार गृहातून मुलगा पळाला

By Admin | Updated: April 4, 2016 05:51 IST2016-04-04T05:51:53+5:302016-04-04T05:51:53+5:30

विनयभंगाच्या आरोपात कोराडी पोलिसांनी बाल सुधार गृहात ठेवलेला १५ वर्षीय विधिसंघर्ष बालकाने शनिवारी सायंकाळी

Child escapes from child rehabilitation house | बाल सुधार गृहातून मुलगा पळाला

बाल सुधार गृहातून मुलगा पळाला

नागपूर : विनयभंगाच्या आरोपात कोराडी पोलिसांनी बाल सुधार गृहात ठेवलेला १५ वर्षीय विधिसंघर्ष बालकाने शनिवारी सायंकाळी पळ काढला. पाटणकर चौकाजवळच्या शासकीय मुलांचे निरीक्षणगृहात (बाल सुधार गृह) ही घटना घडली. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.
सुधारगृहाचे फिर्यादी गंगाधर सुखदेव हटवार यांनी जरीपटका ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, नमूद मुलाला खेळण्यासाठी शनिवारी सायंकाळी इतर मुलांसोबत मैदानात काढले होते.
त्याने सर्वांची नजर चुकवून पळ काढला. श्रद्धानंद अनाथालयातील नेहा रमेश कठाळेचे संशयास्पद मृत्युप्रकरण चर्चेला असताना बाल सुधार गृहातील मुलगा पळून गेल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक आर.के. ठाकूर पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Child escapes from child rehabilitation house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.