शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चिकुनगुनियाच्या रुग्णांत ६४ टक्क्यांनी वाढ; नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:18 IST

राज्यातील स्थिती : मलेरियाच्या 'पीएफ' प्रकारानेही वाढवली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: राज्यात गतवर्षी नोंद झालेल्या कीटकजन्य आजाराच्या रुग्णसंख्येने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. चिकुनगुनिया व मलेरियाच्या प्रकोपाने रुग्ण हवालदिल झाले होते. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत ६४ टक्क्याने, तर मलेरियाच्या 'प्लासमोडियम फेल्किपेराम (पीएफ) या घातक प्रकारात ४३.७४ टक्क्याने वाढ झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे यावर्षी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नागपुरात चिकुनगुनियाचा उद्रेक २००६ मध्ये झाला. परंतु त्यावेळी याची तीव्रता कमी होती. तब्बल १८ वर्षांनंतर या आजाराच्या रुग्णांत मोठी वाढ झाली. स्नायू व सांधेदुखी सोबतच चेहरा काळवंडणे, जांघेत, खाकेत अल्सरमुळे रुग्ण त्रस्त झाले होते. माहिती अधिकारात अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार राज्यात चिकुनगुनियाचे २०२२ मध्ये १४ हजार ७८५ संशयित रुग्ण आढळून आले होते. 

यातील १ हजार ८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. २०२३ मध्ये ३१ हजार १८१ संशयित रुग्णांमध्यून १ हजार ७०२ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर, २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सर्वाधिक ४८ हजार ४५८ संशयित रुग्णांची नोंद होऊन यातील ४ हजार ७९२ रुग्णांना हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले. 

कमी झालेला मलेरिया वाढला मलेरिया म्हणजे हिवतापाचे २०२२ मध्ये १५ हजार ४५१ रुग्ण होते. २०२३ मध्ये ते कमी होऊन १६ हजार १५९ वर आले तर २०२४ मध्ये पुन्हा वाढ होऊन रुग्णसंख्या १७ हजार ४४० वर गेली. 

मलेरियाच्या घातक प्रकाराने घेतला २१ जणांचा जीव २०२२ मध्ये मलेरियाच्या 'प्लासमोडियम फेल्किपेराम (पीएफ) या घातक प्रकाराचे ८ हजार ९८३ रुग्ण व २६ मृत्यू होते. २०२३ मध्ये या प्रकाराचे ६ हजार २९७ रुग्ण व १९ मृत्यूची नोंद झाली असताना २०२४ मध्ये यात वाढ होऊन रुग्णसंख्या ७ हजार ६३३ वर पोहोचली आणि २१ जणांचे जीव गेले. 

डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घटराज्यात सर्वच ठिकाणी २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट दिसून आली. २०२२ मध्ये डेंग्यूचे ८ हजार ५७८ रुग्ण व २७ मृत्यू, २०२३ मध्ये १९ हजार ३४ रुग्ण व ५५ मृत्यू तर २०२४ मध्ये १६ हजार ८४३ रुग्ण व २६ मृत्यूची नोंद झाली.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर