मुख्यमंत्र्यांचे कार्यालय उपराजधानीत सुरू
By Admin | Updated: March 28, 2015 01:47 IST2015-03-28T01:47:42+5:302015-03-28T01:47:42+5:30
शुक्रवारचा दिवस उपराजधानीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. शुक्रवारी अनौपचारिकपणे शहरातील हैद्राबाद

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय उपराजधानीत सुरू
हैद्राबाद हाऊसमध्ये व्यवस्था : आशा पठाण यांच्याकडे जबाबदारी
नागपूर : शुक्रवारचा दिवस उपराजधानीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. शुक्रवारी अनौपचारिकपणे शहरातील हैद्राबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री कार्यालय सुरू झाले. उपजिल्हाधिकारी आशा पठाण यांच्याकडे ओसएसडी म्हणून या कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारपासून कामाला सुरुवात केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दर शनिवारी व रविवारी नागपूर दौऱ्यावर असतात. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातही मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याबाबत चर्चा केली जात होती. शुक्रवारी ती चर्चा प्रत्यक्षात पूर्ण झाली. मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिल रोजी या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या कार्यालयासाठी डझनभर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. कार्यालयाच्या कामकाजालाही सुरुवात झाली आहे.
नागपुरात लवकरच सचिवालयसुद्धा स्थापित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री आपले शासकीय निवासस्थान रामगिरी येथून कामकाज चालवित आहेत. (प्रतिनिधी)