शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरू करणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:38 IST

महाराष्ट्र पोलीस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलीस दलातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी पोलीस क्रीडा अकादमी सुरू करण्यात येईल. अकादमीमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र पोलीस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलीस दलातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी पोलीस क्रीडा अकादमी सुरू करण्यात येईल. अकादमीमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.नागपूर शहर पोलीस मुख्यालय, शिवाजी स्टेडियम येथे बुधवारी ३१ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०१९ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, पोलिस महासंचालक डी. डी. पलसलगीकर, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलिस महासंचालक श्रीमती प्रज्ञा सरोदे, विशेष पोलिस महानिरीक्षक अनूप कुमार सिंग, विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र के. एम. एम. प्रसन्ना उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण वातारवरणात काम करतात. अशावेळी विविध खेळ प्रकारामुळे ताणतणावांचे व्यवस्थापन करणे सोईचे जाते. क्रीडा स्पधेर्मुळे सांघिक भावना निर्माण होते. तसेच संघात खेळत असताना आपण उत्कृष्टपणे खेळावे ही भावना वैयक्तिक जीवनात देखील मदतनीस ठरते. गेल्या चार वर्षांमध्ये शासनाच्या वतीने पोलिस दलासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलिस दलाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिस दलातील खेळाडू तयार होण्यासाठी लवकरच क्रीडा अकादमी उभारण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाच्या संचलनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी स्पर्धकांचा शपथविधी पार पडला. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणाºया सोनिया मोकल, राहुल काळे यांनी क्रीडा ज्योत पेटविण्यासाठी मशाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली. मुख्यमंत्र्यांनी मशालच्या सहाय्याने क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पधेर्चे रितसर उद्घाटन केले.सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक उत्तम मोटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये८ परिक्षेत्र, ४ आयुक्तालय तसेच एका प्रशिक्षण केंद्रातून स्पर्धक सहभागी झालेले आहेत. यामध्ये २ हजार ८६४ पोलिस दलातील स्पर्धकांचा समावेश आहे. पैकी २८४ महिला सहभागी आहेत. क्रीडा स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, हॅण्डबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, अ‍ॅथेलिटिक, बॉक्सिंग, स्विमिंग, कुस्ती, वेट लिफ्टिंग तसेच यंदा नव्याने सुरु केलेल्या टायकान्डो तसेच वूशू अशा १६ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.प्रास्ताविक पोलिस महासंचालक डी. डी. पलसलगीकर यांनी केले. संचालन आणि आभार पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी मानले. यावेळी पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, पोलिस अधीक्षक राकेश ओला, सहाय्यक पोलिस क्रीडा अधिकारी बाजीराव कलंत्रे, समादेश जावेद अहमद तसेच पोलिसांचे आप्त स्वकीय उपस्थित होते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस