Maharashtra CM; मुख्यमंत्री राज्याला जगातील सर्वोत्तम राज्य बनवतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 10:49 IST2019-11-23T10:49:02+5:302019-11-23T10:49:31+5:30
राज्यात शनिवारी सकाळी स्थापन झालेल्या सरकारला शुभेच्छा देताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार, महाराष्ट्राला जगातले सर्वोत्तम राज्य बनवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Maharashtra CM; मुख्यमंत्री राज्याला जगातील सर्वोत्तम राज्य बनवतील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्यात शनिवारी सकाळी स्थापन झालेल्या सरकारला शुभेच्छा देताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार, महाराष्ट्राला जगातले सर्वोत्तम राज्य बनवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले,
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित शहाजी आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करून नवचैतन्य निर्माण झाले आहे. आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात नव्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आनंददायी पर्वाची सुरुवात आज झाली आहे. अजितदादा पवार हे अतिशय कार्यक्षम नेते आहेत. ते आणि मुख्यमंत्री साहेब राज्याला जगातील सर्वोत्तम राज्य बनवतील.