शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी एनसीआरबीच्या अहवालानुसार गुन्हेगारीवर बोलावे - धनंजय मुंडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:44 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीआरबीने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर बोलावे, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले. 

नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीआरबीने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर बोलावे, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले. देशातील सध्या वातावरण पाहता असे आहे की, सरकार विरोधात बोलले की देशद्रोही ठरविले जाते. राज्य सरकारवर आरोप केले तर राज्याला बदनाम करतायत असे सांगितले जाते. आम्ही दिलेले पुरावे खोटे असतील तर आमच्यावर बदनामीचे खटले भरा. आम्हाला कुठल्याही चौकात शिक्षा द्या आम्ही तयार आहोत. मात्र, पुराव्यांची शहानिशा करा, असे धनंजय मुंडे म्हणाले. यापुढे म्हणाले, असंख्य पुरावे देऊनही राज्याचे मुख्यमंत्री मंत्र्यांना क्लिन चीट देतात. ११ कोटी जनतेचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री 11 जनतेची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार मुक्त करु असे म्हणाले होते. मात्र, सत्तेत आल्यापासून प्रथम क्रमांकाचे भ्रष्टाचार युक्त राज्य केले आहे. तसेच, आम्ही नागपूरला क्राइम वाढल्याची टीका केली. यावर मुख्यमंत्री म्हणातात विरोधक नागपूरला बदनाम करत आहेत. मग आता एनसीआरबीचा अहवाल भ्रष्टाचार, क्राईम वाढल्याचे सांगत आहे. या एनसीआरबीच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी बोलावे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. याचबरोबर, महिलांच्या विनयभंगाबाबतीत राज्य प्रथम क्रमांकावर आहे. असे असताना...मी लाभार्थी हे माझे सरकार, अशी जाहिरात करते. तसेच, बिहारला मागे टाकून महाराष्ट्र पुढे गेला आहे. त्यामुळे आता हे माझे सरकार अशी पुन्हा जाहीरात करणार का? असा सवालही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे