शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुख्यमंत्री स्वबळावर सरकार खेचत आहे; जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 14:41 IST

केंद्राच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वबळावर सरकार खेचत असून मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी मजा घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत मांडला सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौथ्या वर्षातही राज्य सरकारची कामगिरी दिसत नाही. आर्थिक धोरणे सपशेल अपयश ठरलेली आहेत. कर्जमाफीची घोषणा करण्यात आली परंतु शेतकऱ्यांना लाभ झालेला दिसत नाही. प्रकल्पांच्या बाबतही अशीच अवस्था आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव लिटरमागे १० रुपयांनी अधिक आहे. केंद्राच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वबळावर सरकार खेचत असून मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी मजा घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.केंद्र व राज्य सरकारमधील अस्वस्थता विचारात घेता लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका एकत्रित घेणार नाही. दोन्ही निवडणुका एकत्रित घेतल्यातर लोकसभेच्याही जागा कमी होतील अशी भाजपा नेत्यांना भिती आहे. या देशात जेव्हाजेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. तेव्हातेव्हा मतदारांनी सत्ता बदल घडविला.. देशात अशीच परिस्थिती आहे. पुरोगामी विचाराचे राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भाजपा सारख्या जातीयवादी पक्षासोबत कधीही जाणार नाही. आपले राजकीय स्थान बळकट करण्यासाठी पवार यांच्यावर आरोप केले जातात. गोपीनाथ मुुंडे, गो.रा. खैरनार यांनी असेच आरोप केले होते. आता डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. वास्तविक भिमा कोरेगाव घटना घडताच हे मनुवाद्यांचे षडयंत्र असल्याचे पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.संभाजी भिडे तरुणांची डोकी भडकावण्याचे काम करतात. फुले, शाहू व आंबेडकरांवर ते कधी बोलत नाही. खा. उदयनराजे भोसले म्हणतात ते उच्च शिक्षित आहेत. परंतु ते शिकले कि ती आहे. त्यांनी कोणत्या पदव्या घेतलेल्या आहे. याचा भिडे यांनी जाहीर खुलासा करावा, असे आव्हाण देत भाजपाच्या राज्यात त्यांना अटक होण्याची शक्यता नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. भिमा कोरेगाव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी हा फार्स आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. पंतप्रधात नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणाचा आजच्या परिस्थितीशी कोणताही संबंध नाही. त्यांनी चुकीचा इतिहास जनतेपुढे मांडला. मोदी देश सांभाळू शकतात तर मग अखिल भारतीय काँग्रेसचे अध्ययक्ष राहूल गांधी देश का सांभाळू शकणार नाहीत. असा सवाल आव्हाड यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस