मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘रामझुल्या’चे उद््घाटन
By Admin | Updated: December 6, 2014 02:40 IST2014-12-06T02:40:37+5:302014-12-06T02:40:37+5:30
प्रदीर्घ काळ चाललेल्या बांधकामामुळे चर्चेत आलेला संत्रा मार्केट रेल्वे उड्डाण पुलाचे (रामझुला) उद््घाटन शनिवारी सायं. ६ वा. ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘रामझुल्या’चे उद््घाटन
नागपूर : प्रदीर्घ काळ चाललेल्या बांधकामामुळे चर्चेत आलेला संत्रा मार्केट रेल्वे उड्डाण पुलाचे (रामझुला) उद््घाटन शनिवारी सायं. ६ वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते होणार आहे.
आघाडी सरकारच्या कार्यकाळात या पुलाचे बांधकाम सुरू झाले. मात्र त्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे कामात विलंब झाला. आताही पुलाच्या एकाच भागाचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या उद््घाटनासाठी मुख्यमंत्री येत आहेत. दुपारी ४.४५ वा.त्यांचे मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी जातील. ६ वा. रेल्वे उड्डाण पुलाच्या उद््घाटन समारंभाला उपस्थित राहतील व त्यानंतर ते ७.५० वा. विमानाने दिल्लीला रवाना होतील. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यावर रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)