शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

रेल्वेस्थानकांबाहेरील अवैध दुकाने हटविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:17 IST

मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावर सप्टेंबरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच स्थानकांबाहेरील अवैध स्टॉल्स आणि दुकाने हटविण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

नागपूर : मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावर सप्टेंबरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच स्थानकांबाहेरील अवैध स्टॉल्स आणि दुकाने हटविण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अवैध फेरीवाल्यांना आधीच हटविण्यात आले आहे. मुंबईत एक नवीन स्कायवॉक, १० नवीन फूटओव्हर ब्रिजेस आणि सध्याचे २१ पूल नव्याने बांधण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडून आलेले आहेत. सुरक्षिततेसाठी राज्य पोलिसांच्या मदतीने जादा कुमक ठेवण्यात आली आहे. एल्फिन्स्टन स्टेशनवरील दुर्घटनेसाठी कोणताही अधिकारी जबाबदार नव्हता, असे रेल्वे प्रशासनाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.विकासकांनी महापालिकेचे कोट्यवधी रुपये थकविलेनागपूर : मुंबई महापालिकेच्या जागांवर उभ्या राहिलेल्या म्हाडा व एसआरएच्या इमारतींपोटी विकासकांनी महापालिकेकडे अद्यापही प्रिमियमची ३८९ कोटी रुपयांची रक्कम भरलेली नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार व इतरांच्या प्रश्नात त्यांनी सांगितले की, एकूण १२३ विकासकांकडून महाापलिकेला १ हजार २४० कोटी रुपये घ्यायचे होते. आतापर्यंत ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून अन्य उभारले जात आहेत. विकास नियंत्रण नियमावलीच्या कलम ३३ (७) नुसार प्रिमियमची रक्कम भरावी लागते. विकासकांनी आतापर्यंत त्यापोटी ८४६ कोटी रुपये भरले आहेत पण ३९३ कोटी रुपये भरणे बाकी आहेत. अशी थकबाकी असलेल्या विकासकांना बांधकाम थांबविण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत.४६ अधिका-यांची चौकशीनागपूर : मुंबईतील म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या विविध बांधकामांचे बनावट चाचणी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी २० कंत्राटदार आणि १७ मजूर सहकारी संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून म्हाडाच्या ४६ अधिकाºयांची चौकशी केली जात असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बाबतचा प्रश्न विचारला होता.अ‍ॅसिडने झाडे पाडणा-या विकासकांविरुद्ध गुन्हेमुंबई : चेंबूर; मुंबई येथे अ‍ॅसिडचा वापर करून झाडे पाडणा-या दोन विकासकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, करिष्मा डेव्हलपर आणि वीणा डेव्हलपर यांच्या विरुद्ध गेल्या नोव्हेंबरमध्ये तक्रारी आलेल्या होत्या. वृक्षसंवर्धन व संरक्षण कायद्यांतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७