सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपुरात आज नागरी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 11:29 IST2020-01-18T11:26:43+5:302020-01-18T11:29:06+5:30
नागपूरचे सुपुत्र आणि सध्या विधी क्षेत्रात देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपूर महापालिकेतर्फे शनिवारी सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपुरात आज नागरी सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे सुपुत्र आणि सध्या विधी क्षेत्रात देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपूर महापालिकेतर्फे शनिवारी सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती राहील. गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री तथा न्पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश रवी देशपांडे यांची उपस्थिती राहील. विशेष अतिथी म्हणून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.