शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट-राठी ठरणार विदर्भातील पहिले ‘सौरग्राम’

By आनंद डेकाटे | Updated: January 10, 2025 17:52 IST

Nagpur : शासकीय निधीच्या मदतीशिवाय केले साध्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील पहिला शंभर टक्के ‘सौरग्राम’ होण्याचा मान आता लवकरच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट-राठी या गावाला मिळणार आहे. सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणाऱ्या या गावाने शासकीय निधीची कुठलीही मदत न घेता ही किमया साध्य करणाऱ्या या गावाने संपूर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान दोन गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून, या मोहिमेंतर्गत चिचघाट-राठी या गावाची निवड करण्यात आली असून, गावातील सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे ८११ किलोवॉट झाली आहे.

वर्धा शहरापासून ४० किमीच्या अंतरावर असलेले आणि महावितरणच्या हिंगणघाट (ग्रामीण) उपविभागांतर्गत असलेल्या चिचघाट-राठी या गावाचे हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते. मे हा अतिउष्णतेचा असल्याने सोबतच जवळपास वर्षभर असलेल्या स्वच्छ सूर्यप्रकाशाचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचा मानस करत येथील गावकऱ्यांनी महावितरणच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान सूर्यघर’-मोफत वीज योजनेत सहभागी होत गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करून एकजुटीने ‘सौर’ उड्डाणाकडे यशस्वी प्रवास सुरू केला आहे.गावामध्ये घरगुतीच्या ७०, औद्योगिक ४, वाणिज्यिक १, यासोबतच अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, पथदिवे आणि सार्वजनिक पाणीपुरवठा यासारख्या वीजजोडणी असलेल्या ग्राहकांनी छतावर सौरनिर्मिती प्रकल्प उभारून पर्यावरणपूर्वक वीजनिर्मिती सुरू केली आहे. घरगुती श्रेणीतील ७० ग्राहकांपैकी तब्बल ६५ ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने बँकेकडून कर्ज घेत, दोन ग्राहकांनी स्वखर्चाने, तर उर्वरित ग्राहकांना पी. व्ही. टेक्सटाइल्स या उद्योगाने दत्तक घेत सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारले आहे.

टॅग्स :Hinganghatहिंगणघाटwardha-acवर्धाnagpurनागपूरVidarbhaविदर्भ