मनपातर्फे छठपूजेसाठी सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:18 IST2017-10-24T00:18:11+5:302017-10-24T00:18:27+5:30

उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या छठपूजेच्या निमित्ताने लाखो भाविक शहरातील विविध तलावावर अर्घ्य अर्पण करण्यासाठी एकत्रित येत असतात.

Chhatrapava facility by Manpath | मनपातर्फे छठपूजेसाठी सुविधा

मनपातर्फे छठपूजेसाठी सुविधा

ठळक मुद्देमहापौरांनी केली पाहणी : पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या छठपूजेच्या निमित्ताने लाखो भाविक शहरातील विविध तलावावर अर्घ्य अर्पण करण्यासाठी एकत्रित येत असतात. या ठिकाणी महापालिकेतर्फे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी पोलीस लाईन टाकळी येथील तलावाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. नगरसेवक सुनील अग्रवाल व गार्गी चोपडा उपस्थित होत्या.
२४ ते २७ आॅक्टोबरदरम्यान हा धार्मिक उत्सव असून २६ ला सायंकाळी आणि २७ ला पहाटे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यात येणार आहे.
भाविकांची गर्दी लक्षात घेता कामांना गती देण्याचे आदेश, महापौरांनी यावेळी दिले. यावेळी मुन्ना ठाकूर, प्रमोद ठाकूर, राजेश तिवारी, रितेश सिरपेठ, शैलेश गायकवाड, संजय मोहोड, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Chhatrapava facility by Manpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.