छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

By Admin | Updated: February 20, 2015 02:22 IST2015-02-20T02:22:55+5:302015-02-20T02:22:55+5:30

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध शाळा, संस्था, संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj accepted the offer | छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

नागपूर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध शाळा, संस्था, संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही संस्थांनी यानिमित्त रॅली काढली. शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला. महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान
प्रतिष्ठानाच्यावतीने महाराजांच्या जयंतीनिमित्त महाल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. राजेंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केले. यावेळी आयोजित गोंधळ स्पर्धेत विविध शाळांनी नृत्य सादर केले. याप्रसंगी दिल्ली येथे लेझीम सादर करण्यासाठी प्रतिनिधित्व केलेल्या २१ शाळांच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रभाकर कापसे, इतिहासकार चंद्रशेखर गुप्त, क्रीडा सामाजिक कार्यकर्ते डॉ. हंबीरराव मोहिते, पत्रकार वैभव गांजापुरे, एबीपी माझाच्या पत्रकार सरिता कौशिक, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खानोरकर, नाट्य कलावंत लक्ष्मण जाधव, मूर्तिकार मनोज सुंकूरवार यांना सन्मानित करण्यात आले. तसेच स्व. माधवराव चांदपूरकर स्मृती पुरस्काराने पोलीस कर्मचारी सुखदेव धुर्वे यांना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला खा. कृपाल तुमाने, आ. कृ ष्णा खोपडे, विकास कुंभारे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, राजे मुधोजी भोसले आदी उपस्थित होते.
विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था
अजनी येथील पतसंस्थेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक नगराळे, सचिव ज्ञानेश्वर महल्ले यांनी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
जेसीआय नागपूर कळमना सिटी
जेसीआय नागपूर कळमना सिटीच्या अध्यक्ष रूपाली जिचकार यांच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. महाल येथील महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कृष्णकुमार जैस, पंकज वर्मा, आशिष जिचकार, अंकेश शाहू, निखिल ठाकरे, रंजना डोंगरे, मंगेश कोलरवार, नीरज हिवसे, भारती उपासे, उज्ज्वला मुकादम उपस्थित होते.
साकार मागासवर्गीय विकास मंडळ
मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खापरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन क रण्यात आले. यावेळी सलामी देऊन महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी अमित हजारे, पुरुषोत्तम कांबळे, रंजित बेले, सुदर्शन गोडघाटे उपस्थित होते. मिठाईचे वाटपही करण्यात आले.
काँग्रेस सेवादल
नागपूर शहर काँग्रेस सेवादलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधीगेट जवळील पुतळ्याला माल्यार्पण करून मानाचा मुजरा देण्यात आला. यावेळी सेवादलाचे प्रमुख रामगोविंद खोब्रागडे, सुलभा नागपूरकर, स्मिता कुंभारे, देवेश गायधने, गोविंद उरकुडे, प्रभूदास तायवाडे, माया घोरपडे, राजकुमारी फोपरे, संतोष गुडपवार, एन. रामचंद्र, सिद्धार्थ ढोले, प्रमिला गोंडाणे, सुनिता शेंडे, आरती गाणार, सतीश तारेकर, सुनील घोरपडे, कैलास चरडे, मच्छिंद्र जीवने, हरिदास डोंगरे आदी उपस्थित होते.
अभिनंदन हायस्कूल
ओमनगर येथील अभिनंदन हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुखदेव ठाकरे प्रमुख अतिथी डॉ. अनिल पांडे, लक्ष्मीकांत कातोरे, डॉ. नरेंद्र भुसारी, रश्मी पाटील उपस्थित होते. यावेळी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
विदर्भ पदवीधर एकता मंच
मंचचे संयोजक पद्मश्री तांबेकर यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सतीश भगत, संतोष गोटाफोडे, राजेंद्र अतकरी, सुनील बोरकर, पंकज बांते, गजानन वानखेडे, अमर चकोले, चंदू कामडे, मोहन हजारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी जयंती साजरी करण्यात आली. कुंभारे यांच्या हस्ते महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निशिकांत सुके, अजय रामटेके, रमण जैन, गिरीश जोशी, तहसिलदार भास्कर बांबोर्डे, रोहिणी पाठराबे उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालय
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याहस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अप्पर आयुक्त एम.ए.एच. खान, उपआयुक्त अप्पासाहेब धुळाज व इतर अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
आयुध निर्माणी, अंबाझरी
आयुध निर्माणीतील वित्त व लेखा नियंत्रक कार्यालयात कार्यालयाध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सहायक नियंत्रक राकेश मोहन, वरिष्ठ लेखा अधिकारी जे. एम. लभाने उपस्थित होते. महाराजांच्या जीवनावर शिरीष असेरकर यांनी प्रकाश टाकला. महाराजांच्या जीवनकार्यावरील चित्रपट सादर करण्यात आला.
भारिप बहुजन महासंघ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाठोडा येथील पक्षाच्या कार्यालयात शहर अध्यक्ष विनोद गजभिये, देवेंद्र मेश्राम, अंबादास गजभिये, सोमेश्वर नागदेवते, प्रवीण रंगारी, विनोद नाईक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विनोद मेश्राम यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
नागपूर शहर काँग्रेस
कमिटी ब्लॉक नं. ९
नागपूर शहर काँग्रेस कमिटी ब्लॉक नं. ९ त्रिमूर्तीनगर सुभाषनगरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम पारमोरे, सुरेंद्र तिवारी, हरी नायर, साहेब साबळे, अनंत कोशेट्टीवार, कमलेश लारोकर, बाळकृष्णा तुराळे, संजय बोबडे, संजय तुरणकर आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपब्लिकन युथ फोर्स
पीपल्स रिपब्लिकन पार्टीप्रणीत रिपब्लिकन युथ फोर्सतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमत्त महाल येथील पुतळ्याला जयदीप कवाडे यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कवाडे यांनी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला कपील लिंगायत, अजय चव्हाण, प्रज्योत कांबळे, स्वप्नील महल्ले, प्रकाश कांबळे, नीलेश बोरकर, नितीन खेडकर, महेंद्र पावडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब
कर्मचारी कल्याण महासंघ
महासंघाच्या वतीने महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या महाल येथील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कास्ट्राईबचे अध्यक्ष अरुण गाडे, राजेश ढेंगरे, सुगत रामटेके, संजय सायरे, रेखा लोखंडे, अहिंसक लखोटे, अ‍ॅड. हरिहर बोरकर, विनेश शेवाळे, संजय गोडघाटे आदी उपस्थित होते.
नॅशनल पीपल्स
सोशल आॅर्गनायझेशन
संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाल येथील महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेश ढेंगरे, नगरसेविका सुजाता कोंबाडे, डॉ. दिलीप सुखदेवे, अमर रामटेके, डॉ. विठ्ठल कोंबाडे आदी उपस्थित होते.
गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था
अध्यापक लेआऊट, हिंगणा रोड येथे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष म्हणून कवीश्वर करुटकर, मार्गदर्शक शिवाजी तोडासे, सविता नितनवरे, लीला नारखेडे, पुष्पा मडावी उपस्थित होते. याप्रसंगी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित वक्त्यांनी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
नागपूर शहर जिल्हा
काँग्रेस कमिटी
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम शिवाजी पुतळा, गांधीगेट, महाल येथे साजरा करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी आमदार यादवराव देवगडे, उपाध्यक्ष राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, कमलेश समर्थ, तुफैल अशर, विजय बाभरे, अतुल कोटेचा, रत्नाकर जयपूरकर, दिलीप ठाणेकर आदी उपस्थित होते. यावेळी विजयी घोषणा देण्यात आल्या. ठाकरे व मुत्तेमवार यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी,
नागपूर महानगर
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधी गेट, महाल येथील अश्वारूढ प्रतिमेला शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी महाराजांचा जयघोष केला.
कार्यक्रमाला महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, बंडू राऊत, विलास त्रिवेदी, डॉ. कल्पना पांडे, संध्या समर्थ, सुधीर हिरडे, उषा पॅलट, रश्मी फडणवीस, जितू ठाकूर, मनीष मेश्राम व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj accepted the offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.