पाण्याची रासायनिक तपासणी
By Admin | Updated: July 22, 2014 00:57 IST2014-07-22T00:57:12+5:302014-07-22T00:57:12+5:30
दूषित जलस्रोतांचा शोध घेण्यासाठी दर महिन्याला पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाते. दूषित पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने

पाण्याची रासायनिक तपासणी
जिल्हा परिषद : दूषित पाण्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना
नागपूर : दूषित जलस्रोतांचा शोध घेण्यासाठी दर महिन्याला पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाते. दूषित पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने रासायनिक तपासणी अभियान हाती घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत सोमवारी देण्यात आली.
रासायनिक प्रक्रि येमुळे पाण्यातील क्लोराईड, आयर्न, नायट्रोजन व टीडीएस क्लोराईड इत्यादीचे प्रमाण शोधले जाते. दूषित जलस्रोताच्या ठिकाणी उपाययोजना हाती घेण्यात आल्याने जिल्ह्यातील दूषित पाण्याच्या टक्केवारीला आळा बसत असल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी दिली.
पावसाळ्याच्या दिवसात साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही बाब विचारात घेता वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, साथरोग नियंत्रण अधिकारी, ग्रामसेवक आदींना दिल्या आहेत. १ जानेवारी ते १४ जून २०१४ दरम्यान जिल्ह्यातील १,७१,७०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्र मांतर्गत हिवतापाला आळा घालण्यासाठी २६,७५७ रक्त नमुने तपासण्यात आले. यातील २१ रुग्णांचे रक्त नमुने दूषित आढळून आले. बालमृत्यू प्रामुख्याने अतिसारामुळे होतात. याला आळा घालण्यासाठी २८ जुलै ते ८ आॅगस्टदरम्यान आयडीसीएफ उपक्र म राबविला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी दिली. सदस्य जयकुमार वर्मा, शुभांगी गायधने, बबीता साठवणे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)