वेतनाची थकबाकी न देणाऱ्या अधिकाऱ्यांची चाैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:00+5:302021-07-11T04:08:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेगाच्या जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ या काळातील वेतन ...

वेतनाची थकबाकी न देणाऱ्या अधिकाऱ्यांची चाैकशी करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेगाच्या जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ या काळातील वेतन थकबाकीच्या रकमेचा पहिला हप्ता अद्यापही देण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी करून दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण समन्वय समितीने केली असून, विभागीय उपायुक्त अंकुश केदार यांना शुक्रवारी (दि. ९) निवेदन दिले आहे.
या थकबाकीचा पहिला हप्ता जुलै २०१९ आणि तिसरा हप्ता जुलै २०२१ मध्ये देणे क्रमप्राप्त हाेते. शासनाने मात्र सध्या दुसरा हप्ता देण्याची तयारी दर्शविली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यामधील शाळा कर्मचाऱ्यांना या थकबाकीचा पहिला हप्ता मिळाला आहे. मात्र, नागपूर जिल्ह्याला याचा निधी प्राप्त होऊनही पहिला हप्ता देण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी करून दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात शिक्षण समन्वय समितीचे मुख्य समन्वयक अनिल गोतमारे, डॉ. अशोक गव्हाणकर, प्रा. सपन नेहरोत्रा, बाळा आगलावे, गजानन भोरळ, विलास केरडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता.
090721\4356img_20210709_192232.jpg
photo